कलिंगड खा आणि निरोगी रहा ! ‘बीपी’, ‘वेट लॉस’सह ‘या’ 5 गंभीर समस्या राहतील दूर

कलिंगड (watermelon ) शरीराला पोषण देण्यासाठी फायदेशीर आहे. कलिंगड (watermelon ) हे पाणीदार असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्याचे सर्वात मोठे काम ते करते. कलिंगडाचे आणखीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कलिंगड नियमित खाल्ल्याने कोणते गंभीर आजार दूर राहू शकतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत आरोग्यदायी फायदे

1 केस, त्वचा
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असल्याने त्वचा मऊ आणि केस मजबूत होतात. केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. सौंर्द खुलते.

2 अपचन, रक्तदाब
अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनशक्ती मजबूत होते. कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

3 हृदयरोग
कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करत असल्याने हृदयाच्या समस्या दूर राहतात. ब्लॉकेजची समस्या उद्भवत नाही.

4 डिहायड्रेशन
मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगडाचं सेवन लाभदायक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. डिहायड्रेशन दूर होते.

5 लठ्ठपणा
कलिंगडातल्या पाण्यानं पोट भरल्याने लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन वाढत नाही.