खुशखबर ! 25 हजारापर्यंत पगार असणाऱ्यांना सरकार देतंय ‘या’ 19 सुविधांसाठी पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला महिन्याला केवळ 25 हजारापर्यंत पगार मिळत असेल तर निराश होऊ नका. 25 हजारांच्या योगदानावर सरकार तुम्हाला शिक्षण, औषधोपचार आणि लग्नासह 19 प्रकारच्या सुविधांसाठी पैसे देईल. कमी पगाराच्या कामगारांसाठी सरकारने काही तरतुदी केल्या आहेत, परंतु माहिती अभावी त्याचा लाभ मिळत नाही. बऱ्याच राज्यात अशा सुविधा आहेत. हरियाणाच्या अशाच एका योजनेचा उल्लेख करत आहोत.

यामध्ये दरमहा जास्तीत जास्त 75 रुपये शासनाच्या कल्याण निधीमध्ये जमा करायचे आहेत. ज्यामध्ये कामगारांच्या पगारातून 25 रुपये आणि कंपनीच्या व्यवस्थापनातून 50 रुपये वजा केले जातात. प्रत्येक कारखान्याच्या गेटवर त्याचा बोर्ड बसवणे बंधनकारक आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामागरांसाठी ही योजना उपयुक्त आहे.

लग्नासाठी 51 हजार रुपयांची मदत

जर एखादी महिला मजूर असेल आणि तिचं लग्न करायचं असल्यास तिला 51 हजार रुपये मिळतील. आणि कामगाराची मुलगी असेल तर त्यांच्या तीन मुलींच्या लग्नात 51-51 हजार रुपयांची मदत केली जाते. हे पैसे लग्नाच्या तीन दिवस आधी संबंधीताला दिले जातात.

मुलांना शिक्षणासाठी मदत

एखाद्या मजुराची मुलं पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्यास त्यासाठी दरवर्षी शाळेचा ड्रेस, पुस्तक खरेदी इत्यादींसाठी त्यांना 3 ते 4 हजार रुपयांची मदत केली जाते. ही सुविधा दोन मुले आणि तीन मुलींसाठी उपलब्ध आहे. शिष्यवृत्तीची सुविधाही प्रत्येक मजुराच्या तीन मुली आणि दोन मुलांसाठी आहे. 9 वी ते इतर वर्गांसाठी शिकण्यासाठी 5 ते 16 हजार रुपये दिले जातात.

खेळासाठी मुलांना आर्थिक मदत

कामगारांच्या मुलांना सांस्कृतिक स्पर्धांमध्ये भाग घेयचा असल्यास त्यांना 2 ते 31 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. खेळासाठीही मजुरांच्या मुलांना तेवढीच रक्कम दिली जाते. महिला कामगार आणि कामगारांच्या पत्नीस प्रसूतीसाठी 10-10 हजार असे दोन वेळा आर्थिक मदत केली जाते.

अपघात झाल्यास 1.5 लाखांची मदत

चष्मासाठी कामगारांना 1500 रुपयापर्यंतची मदत मिळते. कामगारांना सेवेदरम्यान अपघात किंवा अन्य कारणामुळे अपंगत्व आल्यास दीड लाख रुपयापर्यंतची मदत मिळते. कामगार आणि त्याच्यावर निर्भर असणाऱ्यांना दंत काळासाठी 4 ते 10 हजार रुपयांची मदत मिळते.

कृत्रिम अवयवासाठी मदत

कामगार किंवा त्याच्या कुटुंबीयांना कोणत्याही दुर्घटनेत अपंगत्व आलेल्यांना कृत्रिम अवयवासाठी मदत दिली जाते. पण पगार फक्त 20 हजार रुपये असावा, अशी अट आहे. बधिर कामगारांना ऐकण्यासाठी श्रवण मशीन घेण्यासाठी पाच वर्षातून एकदा 5 हजार रुपयांची मदत दिली जाते.

कामगारांच्या अपंग मुलांना मदत

कमागरांच्या अपंग मुलांना 20 ते 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यासाठी सेवा आणि पगारावर निश्चित मर्यादा नाही. अपंग कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना तीन चाकी वाहनासाठी सात हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्या कामगारांना दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो, त्यांना दर पाच वर्षांनी सायकल खरेदीसाठी तीन हजार रुपये मिळतात. मात्र त्यासाठी सेवा कमीतकमी दोन वर्षे असावी.

शिवणयंत्रासाठी महिलांना मदत

नवीन शिवण कामाच्या यंत्र खरेदीसाठी महिला कामगारांना दर पाच वर्षांनी एका 3500 रुपये देण्याची तरतूद आहे. पाच वर्षांच्या सेवेवर कामगारांना 1500 रुपये एलसीटीची (सुट प्रवासी सवलत) सुविधा दिली जाते.

कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदत

कामाच्या ठिकाणी काम करत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच इतर कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कोणत्याही कारणास्तव मजूर मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 15 हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.