आरोग्यताज्या बातम्या

Benefits Of Amla In Summer | गरमीमध्ये दररोज फक्त 1 आवळा खा; होईल अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Amla In Summer | आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आहारावर लक्ष देणे गरजेचे असते. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे खाण्यापिण्यावर नियंत्रणही असणे आवश्यक आहे. अनेक भाज्या, काही फळे खाण्याने आरोग्याला फायदा होतो. त्याचबरोबर आणखी एक माहिती समोर आली आहे. आवळा, लोणचे अथवा ज्यूस असो, हे फळ अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे (Health Benefits Of Amla), ज्यामध्ये वात, पित्त, कफ असे तिन्ही शारीरिक दोष दूर करण्याची क्षमता आहे. आवळा खाणे का (Benefits Of Amla In Summer ) महत्त्वाचे? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

आवळ्यामध्ये असलेले घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे, पचन सुधारण्यासाठी, चयापचय आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचे काम करतात (Amla For To Boost Immunity, Improve Digestion, Improve Metabolism And Intestinal Health). आवळा व्हिटॅमिन-सी, फायबर आणि मिनरल्स (Vitamin-C, Fiber And Minerals) यांसारख्या अँटीऑक्सिडंट्सने (Antioxidants) समृद्ध आहे. आवळ्यामध्ये संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांपेक्षा दहा पट अधिक व्हिटॅमिन सी असते, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करते आणि पेशींच्या पुनरुत्पादनास मदत करते. (Benefits Of Amla In Summer)

 

दरम्यान, दररोज आवळा खाल्ल्याने वंध्यत्व, पचन समस्या, सर्दी, खोकला आणि ऍलर्जी (Infertility, Digestive Problems, Cold, Cough And Allergy) यासारखे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. आवळ्यात कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या नाहीशा होतात.

 

आवळा रोज किती व का खावा (How Much And Why To Eat Amla Every Day) ?

प्रौढ व्यक्तीने 75-90 मिलीग्राम आवळ्याचे सेवन केले पाहिजे. 100 ग्रॅम आवळ्यात 300 मिलीग्राम व्हिटॅमिन-सी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. आवळा दररोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, वृद्धत्वाशी निगडीत जोखीम कमी होते आणि त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर (Vitamin-A In Amla Is Beneficial For Eye Health) असते. असं तज्ञांचं मत आहे.

 

‘हा’ पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ठ करा (Include This Substance In Your Daily Diet) –

आवळ्याच्या गोड, आंबट आणि तुरट चवीमुळे कच्चा खाण्यास त्रास होतो.
परंतु, ते कच्चे अथवा उन्हामध्ये वाळवून खाण्याचे मोठे फायदे आहेत.
त्याचबरोबर उन्हात वाळवलेला आवळा पोषक तत्वांनी भरलेला असतो, जो तुम्ही कधीही खाऊ शकता. असं तज्ज्ञ सांगतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Amla In Summer | benefits of amla eating just one amla daily in summer is one of the major benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button