जाणून घ्या काळे वाटाणे खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काळे वाटाणे खायला जेवढे चविष्ट आहेत तितकेच ते गुणकारी आहेत. याच्या फायद्यांबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहेत. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) काळ्या वाटाण्याचं सेवन केल्यानं हृदयाशी संबंधित समस्या किंवा तक्रारी दूर राहू शकतात. काळ्या वाटाण्यात अँटी इंफ्लेमेटरी तत्व आणि अँटी ऑक्सिडंट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळं हृदयाशी निगडीत आजार दूर ठेवण्यास याची खूप मदत होते.

2) यात फायबर आणि अतिरीक्त फॅट कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळं काळ्या वाटाण्याची आमटी किंवा भाजी यांचा आहारात समावेश केला तर वजन नियंत्रणात राहतं.

3) काळे वाटाणे मधुमेहींसाठी गुणकारी आहेत.

4) काळ्या वाटाण्यांमुळं पचनक्रिया सुधारते.

5) काळे वाटाणे हे कर्करोगावरही गुणकारी असल्याचं म्हटलं जातं.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.