Benefits Of Black Turmeric | काळी हळद आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी आहे अतिशय गुणकारी, होतात ‘हे’ आश्चर्यकारक 6 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Black Turmeric | काळ्या हळदीला (Black Turmeric) पिवळ्या हळदीची (Yellow Turmeric) दूरची बहीण म्हणता येईल. पिवळ्या हळदीच्या गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहित आहे, आयुर्वेदातही ती औषधी म्हणून वापरली जाते (Benefits Of Black Turmeric). ती आजही बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी (Antioxidant Properties) ओळखली जाते.

 

काळी हळद भारताच्या उत्तर-पूर्व भागात आढळते. काळी हळद आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि चेहर्‍यावरही चांगला प्रभाव दाखवते.

 

काळ्या हळदीचे फायदे (Benefits Of Black Turmeric)

1. पोट बिघडणे (Stomach Problem)
पोटातील गॅस कमी करण्यासाठीही काळी हळद वापरली जाते. त्यामुळे पोटातील त्रास कमी होतो. पोटदुखीतही आराम मिळतो. यासाठी काळी हळद पाण्यात मिसळून प्यावी.

 

2. जखम झाल्यावर (After Injury)
जखम झाल्यास काळ्या हळदीची पेस्ट वापरल्याने लवकर भरते.

 

3. सांधेदुखी (Joint Pain)
सुजलेले पाय आणि सांधेदुखीतही काळी हळद लावल्याने आराम मिळतो. काळ्या हळदीची पेस्ट अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी (Antifungal Properties) परिपूर्ण आहे.

 

4. पीरियड्सच्या वेदना (Periods Pain)
पीरियड क्रॅम्प्स किंवा पोटात वेदना (Period Cramps or Abdominal Pain) जाणवत असताना काळी हळद दुधात मिसळून प्यायल्याने फायदा होतो.

5. रंग उजळण्यासाठी (To Brighten The Color)
पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळद देखील चेहरा उजळण्याचे काम करते. एक चमचा काळ्या हळदीमध्ये एक चमचा मध मिसळून चेहर्‍यावर लावल्यास त्याचा परिणाम दिसून येतो.

 

6. मुरुम आणि डाग (Pimples And Blemishes)
चेहर्‍यावरील मुरुम आणि डागांपासून मुक्त होण्यास काळी हळद मदत करते. एलोवेरा जेलमध्ये काळी हळद मिसळून लावल्याने पिंपल्सशी संबंधित समस्या दूर होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Black Turmeric | read to kno these 6 amazing skin and health benefits of black turmeric or kali haldi che fayde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Diarrhea | डायरियापासून लवकर होईल सुटका, ‘हे’ 10 सोपे घरगुती प्रभावी उपाय करा; जाणून घ्या काय खावे आणि काय खावू नये

 

How To Improve Eyesight | उन्हाळ्यात डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ‘या’ 7 फूड्सचा फायदा; जाणून घ्या

 

Corporator Vasant More | पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे पक्षाच्या WhatsApp ग्रुपमधून लेफ्ट; मनसेतील अंतर्गत धुसफूस वाढतेय ?