नवजात बाळासाठी अमृत असतं ‘स्तनपान’ ! होतात ‘हे’ मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बाळ 6 महिन्यांचं होईपर्यंत त्याला आईचं दूध देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण लहान बाळाची वाढ ही आईच्या दुधामुळं होत असते. यामुळं बाळाचं पोट तर भरतंच सोबतच यामुळं त्याची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळं त्या मुलाला संसर्गजन्य आजार किंवा इतर संक्रमण होत नाहीत. आईचं दूध आहारातील उत्तम स्त्रोत आहे. यात प्रथिनं, चरबी लोह, जीवनसत्वे अशा प्रकारचे पौष्टीक घटक असतात. त्यामुळं बाळाला स्तनपान करणं गरजेचं आहे. बाळाला स्तनपान केल्यानं कोणते फायदे होतात याची माहिती आज आपण घेणार आहोत.

1) आईचं दूध बाळाला अतिसार, श्वसन संसर्गासारख्या आजारांपासून दूर ठेवतं.

2) स्तनपानात पुरेसं लोह असल्यानं बाळाला अशक्तपणा येत नाही. पहिले सहा महिने आईचं दूध हे बाळासाठी संपूर्ण पोषण असतं. 6 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळासाठी आईच्या दूधासह योग्य घन पदार्थ मिळायला हवेत. अशी शिफारस केली जाते की, आपल्या बाळासाठी स्तनपान कमीत कमी वयाच्या 2 वर्षांपर्यंत चालू ठेवावं.

3) स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतं. या अँटीबॉडीज बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीस सूक्ष्मजंतूपासून बचाव करण्यासाठी चालना देतात आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.

4) आईच्या दुधात इम्युनोग्लोबीन ए असतं. जे बाळाला विविध संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतं.

5) स्तनपान केल्यानं आपल्या बाळाला कानाचे संसर्ग, न्युमोनिया आणि मुत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही कमी होते.

6) आईचं दूध बाळाला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करतं. प्रथिनं, चरबी, शर्करा असं संपूर्ण पोषण हे आईच्या दुधातून मिळतं.

7) स्तनपानामुळं मुलांच्या मेंदूचा विकास होतो. त्यामुळं बाळाची बौद्धिक क्षमताही वाढते.

8) फॉर्म्युला मिल्कपेक्षा आईचं दूध हे बाळाच्या वाढीकरता सर्वोत्तम ठरतं. बाळाला पहिल्या 6 महिन्यात केवळ स्तनपान करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळं बाळाच्या पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षणं मिळतं. तसंच आईचं दूध हे पचायला हलकं असतं आणि यामुळं बद्धकोष्ठता होत नाही. त्यामुळं बाळाच्या आतड्यांची प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

स्तनपान देणाऱ्या मातेनं आहारत घ्यावेत हे पदार्थ, तर याचं सेवन टाळावं
स्तनपान देणाऱ्या मातेनं आपल्या आहारात फ्लॅक्सीड्स, दही, अंडी, ताजी फळं आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रथिनं तसेच पुरेसे जीवनसत्व, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लोह, फोलिक अॅसिड ही महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजांचा आहारात समावेश करावा. धूम्रपान आणि मद्यपान टाळायला हवं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.