Benefits Of Buttermilk In Summer | उन्हाळ्यात दररोज ताक प्यायल्यास आरोग्यासाठी होतील ‘हे’ 4 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Buttermilk In Summer | सध्या तापमानात वाढ होत असून, त्यापासून सध्यातरी दिलासा मिळण्याची आशा नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि घाम येणे यामुळे डीहायड्रेशन (Dehydration) होते. त्यामुळे या वेळी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पाण्याची कमतरता भासणार नाही. पाण्याव्यतिरिक्त, आपण रस, शेक, नारळ पाणी, लस्सी आणि ताक यासारखे नैसर्गिक पेय देखील आहेत, जे आपल्याला विविध फायदे देऊ शकतात (Benefits Of Buttermilk In Summer).

 

आज आपण ताकाबद्दल बोलणार आहोत, जे विशेषत: उन्हाळ्यात खूप पसंत केले जाते. ताक केवळ उष्णतेपासून बचाव करत नाही, तर अन्न पचायलाही मदत करते. हे पोटासाठी अगदी हलके असते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही उष्णतेत नियमितपणे ताक प्याल तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील (Benefits Of Buttermilk In Summer).

 

ताक पिण्याचे फायदे (Benefits Of Drinking Buttermilk)

– आयुर्वेदानुसार ताक प्यायल्याने आरोग्य टिकून राहतं आणि अनेक आजार दूर होतात.

– ताक पोटासाठी हलके राहते

– ताक पचायला सोपे आहे, तसेच पचनक्रिया सुधारण्याचे कार्य करते.

– उन्हाळ्यात पोट फुगणे, पाचक समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांवर ताकाच्या नियमित सेवनाने मात केली जाऊ शकते.

ताक कसे बनवायचे (How To Make Buttermilk) ?
१/४ कप दही घ्या आणि त्यात एक कप पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. नंतर त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड घालावी. हँड ब्लेंडर किंवा मिक्सीच्या मदतीने मिसळा. एका ग्लासमध्ये काढा आणि कोथिंबिरीची पाने, पुदिन्याची पाने किंवा कढीपत्त्याने सजवा. दिवसभराचे जेवण खाल्ल्यानंतर ताक प्यावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Buttermilk In Summer | 4 benefits of drinking buttermilk in summers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Latest Study | मृत व्यक्तीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते? अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाने जगाला आश्चर्याचा धक्काच बसला

 

Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे पाणी, रूग्णांना होईल फायदा; जाणून घ्या

 

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम