लहान मुलं अंथरूणात लघवी करतात ? खायला ‘द्या’ ओवा ! जाणून घ्या ‘हे’ 7 मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अचानक घरात कुणाला पोटदुखीचा त्रास झाला तर त्यांना ओवा खायला दिला जातो. इतकंच नाही तर डाळीच्या पीठापासून काही पदार्थ तयार करतानाही त्यात ओवा घातला जातो. जेणेकरून पोटात गॅस धरू नये. ओव्याचे आपल्या शरीराला इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) पोटदुखी, शौचास न होणं किंवा पोट फुगणं या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ एकत्र करून खावं.

2) पोटात आग होत असेल किंवा जळजळ होत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध एकत्र करून खावं. यामुळं फायदा होईल.

3) वारंवार लघवीला येत असेल तर गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याच्या लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या चार चार तासांनी खाव्यात.

4) लहान मुलांचं पोट दुखत असेल तर ओवा अर्क बेंबी भोतवी गोलाकार चोळून पोट शेकवावं.

5) अनेकवेळा दूध पचायला जड जातं. काहींना दूध पिल्यानंतर त्रास होतो. अशांनी दूध पिल्यानंतर चिमूटभर ओवा चावून खावा.

6) ओवा खाल्ल्यानंतर कायम पाणी प्यावं. कारण ओवा उष्ण असल्यानं बऱ्याच वेळा तोंड येण्याची शक्यता असते.

7) अनेकवेळा लहान मुलांना अंथरूणात लघवी करण्याची सवय असते. अशावेळी किंचितसा ओवा गुळासोबत मुलांना खायला द्यावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.