Benefits of Carrot Juice | दररोज प्या गाजरचा ज्यूस, चेहर्‍यावर दिसतील 6 आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Carrot Juice | जेव्हा आपण निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला निरोगी पदार्थांचा अवलंब करावा लागतो. अशावेळी गाजर आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. जमिनीखाली पिकवलेली ही भाजी आपण अनेक प्रकारे वापरू शकतो, त्यात गाजराची खीर आणि कोशिंबीर खूप प्रसिद्ध आहेत. जर आपण गाजराचा रस (Carrot Juice) प्यायला तर आपल्या शरीरावर आणि चेहर्‍यावर अनेक आश्चर्यकारक फायदे दिसू लागतात (Benefits of Carrot Juice).

 

गाजरात आढळणारी न्यूट्रीएंट्स 
गाजरात न्यूट्रीएंट्सची कमतरता नाही, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी (Vitamin A, Vitamin B, Vitamin C) आणि अनेक खनिजे त्यात आढळतात. गाजराच्या हलव्यामध्ये तेलाचा भरपूर वापर केला जातो, त्यामुळे तो आरोग्यदायी पर्याय नाही. जर तुम्ही या भाजीची कोशिंबीर आणि ज्यूस सेवन केला तर तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

गाजराचा रस पिण्याचे फायदे
1. नियमितपणे गाजराचा ज्यूस प्यायल्यास चेहर्‍यावर एक अप्रतिम चमक येण्यास सुरुवात होईल, कारण गाजरामुळे रक्तातील टॉक्सिसिटी कमी होते, ज्याचा परिणाम चेहर्‍याच्या त्वचेवर होऊ लागतो. (Benefits of Carrot Juice)

 

2. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर गाजराचा ज्यूस तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. आपण सर्व जुनी मुरमे आणि हट्टी पुरळ गायब होईल.

 

3. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला थकवा येत नाही.

 

4. हिरड्यांमधून रक्त येत असेल त्यांनी गाजराचा ज्यूस प्यावा. त्यामुळे दातांची चमकही वाढते.

 

5. खोकला थांबत नसेल तर गाजराच्या ज्यूसमध्ये काळीमिरी आणि साखर मिसळून प्या.

 

6. गाजरांमध्ये फायबरसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits of Carrot Juice | carrot juice benefits in marathi skin care face glow pimples digestion weight loss cough cold

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

 

Acidity Problems | अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहात का? करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ताबडतोब होईल परिणाम

 

Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’