‘वजन’ कमी करण्यासोबतच फ्लॉवरचे आहेत ‘हे’ आणखी 5 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉक्टरांकडूनही याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. हिरव्या भाजांच्या यादीत सामिल होणाऱ्या फुलगोबीमध्येही हे गुण आढळतात. फूलगोभी म्हणजेच फ्लॉवर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. क्रूसिफेरस या प्रकारातील ही भाजी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून लढण्यासाठी प्रभावी ठरते.

शरीरासाठी फायदेशीर –

फ्लॉवरमध्ये शरीरासाठी उपयुक्त असणारे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेन्ट आढळतात. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये दैनंदिन प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ ७७ टक्के, व्हिटॅमिन K २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असतं.

इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत फ्लॉवरमध्ये कार्बोहायटड्रेट अधिक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर आहे. १०० ग्रॅममध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरी आणि ३-५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. तसेच फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं.ज्याचा उपयोग पचनक्रिया सुरळित करण्यासाठी होतो. फायबरयुक्त भाज्यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

कॅन्सर आणि हृदयरोगाशी लढण्यास प्रभावी –

फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेन्ट असतात, ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांची प्रभावीता कमी होते. फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेलं ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसान होण्यापासून वाचवतात आणि पेशींचं आरोग्य चागंलं राखण्यास मदत करतात. जे अन्य गंभीर आजारापासूनही संरक्षण करते. तसेच फ्लॉवरच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारतं. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ६ रक्तातील होमोसिस्टीन नियमित करण्यास मदत करते.

गर्भावस्था –

दरम्यान, फ्लॉवरमध्ये असलेलं फॉलिक ऍसिड केवळ महिलांच्या आरोग्यासाठी नाही, तर गरोदर महिलेच्या होणाऱ्या बाळासाठीही महत्त्वपूर्ण आहे. यामुळे विकसनशील गर्भाच्या न्यूरल ट्यूबच्या दोषांचा धोका कमी होत असल्याची शक्यता असते.

You might also like