Benefits of Curd : दह्यात मिसळून खा ‘या’ 10 वस्तू, कॅन्सर, डायबिटीज, बद्धकोष्ठता, प्रोटीनच्या कमतरतेपासून होईल बचाव

पोलिसनामा ऑनलाईन – दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. हे विविध वस्तूंसोबत सेवन केल्यास याचे फायदे वाढतात.

असे खा दही, होईल दुप्पट फायदा

1 दही आणि जीरे
वजन वेगाने कमी करण्यासाठी दह्यात जीरे पावडर मिसळून सेवन करा.

2 दही आणि मध
दह्यात मध मिसळून सेवन केल्यास तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो. यातील अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडाच्या समस्या दूर होतात.

3 दही, काळे मीठ आणि साखर
दह्यात काळे मीठ मिसळून सेवन केल्याने पोटातील गॅस दूर होतो. हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. दह्यात साखर मिसळून खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि यूरिनच्या समस्येत फायदा होतो.

4 दही आणि ओट्स
दही आणि ओट्स एकत्रित खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. मांसपेशी मजबूत होतात.

5 दही, ओवा आणि फळे
दातांचे दुखणे दूर होते. तोंडाचे फोड जातात. शरीर तंदुरूस्त राहते.

6 दही, काळीमिरी, हळद आणि आले
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दह्यात काळीमिरी मिसळून सेवन करा. मुलांसाठी दह्यात हळद आणि आले मिसळून खायला द्या. फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता दूर होते.

दही खाण्याचे फायदे

1 हृदय निरोगी ठेवण्यात उपयोगी.
2 इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते.
3 हाडे मजबूत होतात.
4 ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
5 डोकेदुखीपासून सुटका होते.
6 मुळव्याधीपासून आराम मिळतो.