जाणून घ्या उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गरम किंवा कोमट पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. बदलत्या वातावरणात याचा खूप फायदा होतो. पचनशक्ती, रक्ताभिसरण चांगलं राहण्यास याची मदत होते. दिवसभरात कमीत कमी 5 वेळा कोमट पाण्याचं सेवन करावं. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी पिलं तरी आरोग्य चांगलं राहण्यास खूप मदत होते. आज आपण कोमट पाणी पिल्यानं आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) पोट साफ होतं – कोमट पाणी पिल्यामुळं आतडे संकुचित होण्यास मदत होते. त्यामुळ आतड्यांमध्ये अडकलेला जुना कचरा आपल्या शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळं बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. रोज कोमट पाणी पिल्यानं ही समस्या दूर होऊ शकते.

2) भूक कमी लागण्याची समस्या दूर होते – अनेकांची तक्रार असते की, भूक लागत नाही. पोट साफ न झाल्यानंही ही समस्या येऊ शकते. जर भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळी मिर्ची पावडर टाकून त्याचं सेवन करावं. याचा नक्कीच फादा मिळेल.

3) वजन कमी करण्यासाठी – कोमट पाण्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी देखील होतो. आपलं इंटर्नल टेम्प्रेचर कमी करण्याचं आणि मेटाबॉलिजमला ॲक्टीवेट करण्याचं काम कोमट पाणी करतं. त्यामुळं वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. जर वजन सतत वाढत असेल तर गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून त्याचं सेवन करावं. तीन महिने हा उपाय केला तर फायदा मिळू शकतो. जर तुम्हाला या प्रकारे गरम पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही जेवणानंतर एक ग्लास गरम पाणी पिऊ शकता. यानंही तुम्हाला फायदा मिळेल.

4) चेहऱ्यावर तेज येतं – कोमट पाणी पिल्यानं चेहऱ्यावर तेज येतं. त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. यामुळं केसही लवकर पांढरे होत नाही.

5) कफ, गळा खवखवणं, नाक बंद होणं – कोमट पाणी वाफ निर्माण करतं. त्यामुळं हे पाणी प्यायल्यानंतर श्वास घेण्यात फायदा होतो. कफ, गळा खवखवणं, नाक बंद होणं या समस्यांवर गरम पाण्याचा खूप फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.