पोलीसनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यानंतर अनेकजण गरम किंवा कोमट (Hot water) पाण्याचं सेवन करत असतात. कारण यामुळं शरीराला फायदा होतो. परंतु यात जर हळद टाकून तुम्ही याचं सेवन केलं तर यामुळं अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. याचे अनेक फायदे आहेत ज्याची माहिती आज आपण घेणार आहोत.
1) घसा खवखवत असेल तर आराम मिळतो – अनेकदा सर्दी होण्याआधी किवा वातावरणातील बदलांमुळं घसा खवखवतो किंवा दुखतो. अशा वेळी चिमूटभर हळद घातलेलं पाणी पिलं तर घशाला शेक मिळतो आणि हा त्रास कमी होतो.
2) अन्नपचन होतं – अन्नपचनासाठीही बहुगुणी हळदीचा खूप फायदा होतो. हळदीमुळं पित्तरसाची निर्मिती होते. यामुळं अन्नपचन चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळं सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात हळद टाकून त्याचं सेवन करावं.
3) साखरेची पातळी नियंत्रणात राहते – शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास हळदीची मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी आणि हळद पिली तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
4) सूज कमी करण्यास मदत – विविध कारणांमुळं अनेकांना शरीराच्या विविध अवयवांना सूज येते. हळदीत असणाऱ्या घटकांमुळं शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळं रोज सकाळी न चुकता उठल्यावर हळद आणि पाण्याचं सेवन करावं.
5) चेहरा उजळण्यास मदत – हळद त्वचेसाठीही उत्तम औषध आहे. हळदीमुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसंच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी याची मदत होते. त्यामुळं त्वचा उजळण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते.
6) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. हळदीमुळं हा फायदा मिळतो.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.