Benefits of Drinking Warm Water | वजन कमी करण्यापासून ब्लड सर्क्युलेशनपर्यंत, हिवाळ्यात गरम पाण्याचे होतात ‘हे’ 6 मोठे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Benefits of Drinking Warm Water | उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज सवार्र्ंना माहित आहे. परंतु उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही गरम पाणी पिऊन सुद्धा शरीराला डिहायड्रेशन पासून वाचवू शकता. थंडीत पाणी पिण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत, ज्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (Benefits of Drinking Warm Water)

 

थंडीत पाणी पिण्याचे फायदे

1. डायजेशनमध्ये सुधारणा (Improvement in digestion) –
थंडीत गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट सुधारतो. डायजेशनची समस्या दूर होते. बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशरच्या समस्येची जोखीम कमी होते.

 

2. ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा (Improving Blood Circulation) –
हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचित झाल्याने ब्लड प्रेशर वाढलेले असते. गरम पाणी या रक्तवाहिन्यांना पसरवते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते.

 

3. अंगदुखीमध्ये आराम (Relief in body aches) –
हिवाळ्यात अनेक लोकांना मांसपेशींमध्ये वेदनांची समस्या जाणवते. सांधेदुखी जाणवते. गरम पाणी प्यायल्याने अंगदुखी, डोकेदुखी, पाळीतील वेदना कमी होतात.

4. वेट लॉस (Weight loss) –
लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी दिवसाची सुरूवात गरम पाण्याने करा.

 

5. नाक आणि घशाची समस्या (Nose and throat problems) –
हिवाळ्यात गरम पाणी खोकला, सर्दी आणि इन्फेक्शनची कमी करते, कारण यामध्ये बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमता असते.

 

6. थरथरण्याची समस्या दूर होते (Problem of tremors disappears) –
काही लोकांना थंडी अजिबात सहन होत नाही. त्याचे शरीर सतत थरथरते.
अशावेळी गरम पाणी प्यायल्याने थरथर थांबू शकते.
गरम पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते, यामुळे थरथर होत नाही.

 

Web Title :- Benefits of Drinking Warm Water | 6 benefits of drinking warm water during winters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना