1 ते 6 वर्षांची मुलं एका आठवड्यात होतील धष्टपुष्ट, करा ‘हा’ रामबाण उपाय !

पोलिसनामा ऑनलाईन – पोषणयुक्त पदार्थ लहान मुलांना नियमित खायला घातल्यास ती आजारापासून दूर राहतात. शिवाय ती धष्टपुष्टही होतात. एका अशा पदार्थाबाबत आपण जाणून घेणार आहोत जो बाळाला खाऊ घातल्याने मुल निरोगी आणि सुदृढ राहील. हा पदार्थ आहे ड्रायफ्रुट पावडर. पण ही ड्रायफ्रुट पावडर बाळ 1 वर्षाचे झाल्यावरच त्याला खाऊ घाला. यातून त्याला हवे असलेले सर्व पोषण मिळते.

साहित्य
चांगल्या गुणवत्तेचे 1/4 कप बदाम, 1/4 कप काजू, 1/4 कप अक्रोड, 1 जायफळ आणि 20 ते 25 केसरचे धागे. पसंतीचे ड्रायफ्रुट्सचा सुद्धा यात समावेश करू शकता.

कृती
प्रथम गॅसवर नॉन स्टिक पॅन ठेवून मंद आचेवर बदाम भाजून घ्या. ब्राऊन रंग होईपर्यंत भाजा. भाजलेले बदाम वेगळ्या भांड्यात काढा. अशाच प्रकारे काजू आणि अक्रोड भाजून वेगवेगळ्या भांड्यात ठेवा. गॅस बंद करून नॉन स्टिक पॅनवर केसर सुद्धा हलके भाजून घ्या.

जायफळ वाटून घ्या. गरजेनुसारच जायफळचा वापरा. हे सर्व थंड होऊ द्या. नंतर भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि वाटलेले जायफळ मिक्सर मध्ये टाकून ग्राइंड करा. ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करा.

ड्रायफ्रुट पावडरचे फायदे
* ड्रायफ्रुट पावडर खाल्ल्याने बाळाचे वजन वाढते.
* बाळ मजबूत आणि उत्स्फूर्त बनते.
* मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त असते.
* बाळाची मेमरी चांगली होते.
* बाळ कमी आजारी पडते.