पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय ठरतात ‘अळीव’ ! जाणून घ्या इतर महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना अळीव हा प्रकार माहित आहे. ज्याप्रमाणे बेसन, रवा किंवा शेंगदाण्याचे लाडू केले जातात. तसेच अळीवाचे देखील लाडू केले जातात. बाळंतपणानंतर शरीरातील झीज भरून काढण्यासाठी महिलांना अळीवाचे लाडू दिले जातात.

तसं पाहिलं तर अळीव सर्वांसाठीच गुणकारी आणि फायदेशीर आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) जर मासिक पाळीत कंबरदुखीचा त्रास होत असेल तर अळीवाची खीर प्यावी. यानं फायदा होईल.

2) बद्धकोष्ठता, अपचन या समस्यांमध्ये अळीव फायदेशीर ठरतात.

3) वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

4) हिमोग्लोबिन वाढतं.

5) मासिक पाळीची तक्रार दूर होते.

6) त्वचेसाठी फायदेशीर

7) केसांची वाढ होते.

8) स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.