मुलांना नियमित खाऊ घाला एक सफरचंद, ‘हे’ 18 प्रकारचे आजार राहतील नेहमी दूर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जंक फुडऐवजी मुलांना नियमित एक सफरचंद खाऊ घातल्यास ती नेहमी निरोगी राहतील. रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते, डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही. विशेषत: लहान मुलांना खूप फायदा होतो. सफरचंदामुळे लहान मुलांना होणारे फायदे जाणून घेऊयात…

हे आहेत सफरचंदाचे फायदे
1 यातील कार्बोहायड्रेट्समुळे लहान मुलांना खूप उर्जा मिळते.
2 शरीर उर्जावान राहते.
3 व्हिटॅमिन सी, फायबर आणि फायटोकेमिकल असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
4 लहान मुलांचे पोट साफ राहते.
5 सफरचंदातील अँटीऑक्सीडेंट्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्समुळे दृष्टी चांगली होते.
6 सफरचंदात अस्थमा कमी करणारे गुणधर्म देखील असतात.
7 लहान मुलांना डायरियाचा त्रास सतत होत असल्यास सफरचंद फायदेशीर ठरते.
8 सफरचंदामध्ये डायट्री फायबर असल्याने ते व्हाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करतात.
9 सफरचंद हे पचनशक्ती सुधारण्यास मदत करते.
10 सफरचंदामध्ये मिक्स होणारे फायबर पेक्टीन असल्याने डायरिया सारख्या घटक आजाराला सुद्धा नियंत्रण करते.
11 लहान मुलांच्या शरीरातील रक्ताचा स्तर संतुलित राखण्यासाठी सफरचंद लाभदायक आहे.
12 मधुमेहासारखे गंभीर आजार देखील नियंत्रणात राहतात.
13 सफरचंदात असलेले व्हिटॅमिन सी टिश्यू रिपेअर करण्यासाठी मदत करतात.
14 कोलजन बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे.
15 बाळाच्या हाडांसाठी सुद्धा सफरचंद एक चांगले फळ आहे. हाडांना मजबूत देते.
16 यातील गुणधर्म जखम लवकर भरून काढतात.
17 सफरचंद गालब्लेडरशी निगडीत आजारांपासून बचाव करते.
18 सफरचंदाची सालीत क्वेरसेटीन असते ज्यात अँटीऑक्सीडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असल्याने सुद्धा लहान मुलांसाठी उपयोगी असते.