Benefits Of Eating Banana | रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्याने नुकसान होते का?; वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना फळ खायला खूप आवडतात. काहीजण तर आपल्या दिवसाची सुरूवात फळ खाण्यापासूनच करतात. (Benefits Of Eating Banana) तसेच आपल्याला माहित असेल की, जसं काही फळे फक्त त्याच महिन्यापूर्ती किंवा विशष सिझनमध्येच येतात. तसेच कोणती फळे कोणत्या वेळी खावेत, याचेही एक शास्त्र असते. हे अनेकांना माहित नसेत. (Benefits Of Eating Banana) त्याचप्रमाणे अनेकजण रात्रीच्या वेळी केळी खातात. परंतू काय रात्रीच्यावेळी केळी खाणे योग्य आहे का?, असा प्रश्न अनेकांनासतातवत असतो. तर आज आम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत (Know What Happens If You Eat Banana At Night).

 

आयुर्वेदानूसार, रात्री केळी खाल्ल्याने कोणताही त्रास होत नाही, परंतु जर तुम्हाला सर्दी-खोकला, दमा, सायनस सारख्या समस्याअसतील तर रात्री केळी खाऊ नये. कारण झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्याने श्लेष्म (Mucus) तयार होण्याचा धोका असतो, ज्यामुळेतुमची सर्दी आणि खोकल्याची समस्या वाढू शकते. (Benefits Of Eating Banana) याशिवाय केळी पचायला जास्त वेळ लागतअसल्याने, रात्री केळी खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती असते. मात्र या सर्व गोष्टी असूनही केळी खाणे फायदेशीर आहे.

 

– रक्तदाब कमी करते (Lowers Blood Pressure)
जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारातील सोडियमचे (Sodium) प्रमाण कमी करून पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण वाढवले पाहिजे. अशा परिस्थितीत केळी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

– छातीत जळजळ आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो (Relieves Heartburn And Acidity)
अनेक वेळा रात्री जड जेवण किंवा जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होते.
असे झाल्यास झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्यास ऍसिडिटीची समस्या राहणार नाही. पोटातील ऍसिड कमी करण्यासाठी केळी फायदेशीर ठरते.

– गोड खाण्याची लालसा कमी करते (Reduces Craving For Sweets)
जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना खाल्ल्यानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.
तर तुम्ही गोड खाण्याऐवजी केळी खाऊ शकता. त्यामुळे गोड पदार्थ (Sweet Dish) खाण्याची तुमची लालसा कमी होऊ शकते.

 

– चांगली झोप लागते (Sleep well)
तुमचा दिवस खूप थकवणारा गेला असेल आणि त्यामुळे शरीर दुखत असेल तर यासाठी लगेच केळी खा.
हे तुम्हाला चांगली झोप आणिबरे वाटण्यास मदत करेल. केळीमध्ये पोटॅशियम जास्त असते, जे स्नायूंना (Muscles) आराम करण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Eating Banana | know what happens if you eat banana at night

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

 

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’