विड्याच्या पानाचे 7 आश्चर्यकारक फायदे !, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – जेवणानंतर अनेकांना पान खाण्याची सवय असते. या पानाचे असंख्य फायदे आहेत. आज आपण विड्याचं पान खाण्याचे तसेच त्याचे इतर काय फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) भूक वाढते – विड्याचं पान खाल्ल्यानं भूक वाढते. सकाळच्या नाष्त्यापूर्वी काळ्या मिरीसोबत विड्याचं पान खाल्लं तर भूक वाढते. मिरी आणि पान दोन्ही उष्ण असतात. त्यामुळं याचं प्रमाण नीट आणि मोजून घ्यावं.

2) डोकेदुखी दूर होते – ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी विड्याचं पान हे वरदान आहे. या पानांचा रस जर कपाळाला लावला तर डोकेदुखी थांबते.

3) जखम बरी होते – विड्याचा पानाचा रस जर एखाद्या जखमेवर लावला तर जखम लवकर बरी होते. अंगावर कुठेही फोड किंवा गळू झाला तर विड्याचं पान गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून हे पान फोड आलेल्या ठिकाणी लावावं.

4) साखर – विड्याच्या पानामुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

5) सर्दी खोकला – जर सर्दी खोकला झाला असेल तर विड्याच्या पानासोबत मध खावं.

6) चेहऱ्यावरील डाग, मुरूम – यासाठी 5 ते 6 विड्याची पानं वाटून 1 ग्लास पाण्यात मिक्स करा. त्यानंतर हे पाणी आटवून त्याचा फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा.

7) पचनशक्ती वाढते – विड्याच्या पानामुळं पचनशक्ती सुधारते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.