सालीपासून तर चीकापर्यंत बहुगुणी आहे उंबर ! जाणून घ्या ‘हे’ 8 मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. यापैकीच एक आहे ते म्हणजे उंबर. यालाच औदुंबर असंही म्हटलं जातं. उंबराच्या फळासोबत त्याच्या पानात, सालीत आणि चिकात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळं याचे अनेक फायदे आहेत. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) शरीरावरील सूज कमी करायची असेल तर अल्प प्रमाणात उंबराचा चीक घेऊन त्यात थोडी साखर आणि दूध मिक्स करावं. त्यानंतर या दुधाचं सेवन करावं. शरीरातील कोणत्याही भागातील सूज यामुळं कमी होते.

2) रक्त वाहणे, लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजण्या अशा समस्यांवर उंबराचं फळ गुणकारी आहे.

3) रक्ती आव होत असल्यास उंबराच्या चीकाचे 10 थेंब दुधासोबत घ्यावेत. यामुळं आराम मिळेल.

4) गालगुंड, गंडमाळा, पू असणाऱ्या जखमा आणि हट्टी सूज यावर उंबराचा चीक लावला असता वेदना आणि सूज लवकर कमी होते.

5) उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास कांजण्या विकारात सत्वर आराम मिळतो.

6) मद्यपान किंवा धूम्रपान केल्यानं यकृतवृद्धी होते. तसंच जलोदर होण्याची भीती असते. अशावेळी बकरीच्या दुधात उंबराची फळं उकडून खाल्ल्यास आराम मिळतो.

7) जळवात, टाचांना फोड येणं, रक्त वाहणं, या विकारात उंबराची फळं वाटून त्याचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्यानं बांधून ठेवावं.

8) मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचं चूर्ण दुधातून घ्यावं. सालीचा काढा कदापि करू नये. कारण उष्णतेनं त्यातील ज्वरघ्न गुण जातो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.