‘या’ 3 पद्धतीनं मक्याच्या कणसाचे सेवन करा, आरोग्याला होईल लाभच लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   काही दिवसांतच हिवाळा सुरु होणार आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना गरमा गरम मक्याच्या कणसाचा (Corn) आनंद लूटण्याची इच्छा झाली असेल. अनेकांना वाटतं की मक्याचे कणीस हे फक्त मोकळ्या वेळेत मित्रमैत्रींणीसोबत बसून एन्जॉय केलं जाणार फास्ट फूड (Fast food) आहे. पण असं नाही. तुम्ही मका भले पॉपकॉर्नच्या (popcorn) रुपात खा, स्वीट कॉर्नच्या (sweet corn) रुपात खा किंवा मक्याचे गरमा गरम कणिस खा, हे नेहमीच आपल्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं.

मक्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात पोषक तत्वे तर मिळतातच, शिवाय हे शरीरातील मिनरल्स (minerals) आणि फायबरची (Fibers) कमतरता दूर करतात. जर तुमचाही कॉर्न म्हणजे मक्याबाबत हा गैरसमज असे की हा एक प्रोसेस्ड (processed food) म्हणजे प्रक्रिया केलेला पदार्थ आहे तर तुम्ही ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. कारण मका एक संपूर्ण धान्य असून तो आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. जो आपल्याला निरोगी व सुदृढ (healthy) बनवण्याचं काम करतो.

सदी- खोकल्यावर गुणकारी

मक्याचं कणिस हे अॅटीऑक्सिडंटने परिपूर्ण असतं. त्यामुळे ते कफ किंवा पित्ताला नियंत्रित करतं. त्यामुळेच मक्याच कणिस सर्दी आणि खोकल्यासारख्या साथीच्या रोगांपासून किंवा संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव करतं. सर्दीमुळे नाक बंद असेल आणि श्वास घेण्यास अडथळा येत असेल तर मका खाऊन झाल्यावर उरलेल्या कणीसाचे दोन तुकडे करा आणि त्याच्या आतील भागाचा वास घ्या. मक्याच्या गंधाने तुमचे बंद नाक मोकळे होण्यास मदत होईल.

भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त

ज्या लोकांना भूक कमी लागते त्या लोकांनी दररोज एक मक्याचं कणीस लिंबाचा रस आणि काळं मीठ लावून खाल्लं पाहिजे. अशा प्रकारे कणीस खाल्ल्याने आपल्या पचन तंत्राला उर्जा प्राप्त होते. मेटाबॉलिक रेट वाढून आपली भूक वाढीस लागू शकते. मक्याच्या दाण्यांमध्ये आणि मक्याच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात खालेल्या अन्नाचे पचन योग्य प्रमाणात व सुयोग्य पद्धतीने होते. यासाठी जेवताना मक्याचे सॅलेड जरुर खा.

मानसिक शांती प्रदान करतं

जर तुम्हाला खूपच अस्वस्थ वाटत असेल आणि आपल्या समस्येचं कारण समजत नसेल तर तुम्ही मक्याचं कणीस म्हणजे कॉर्न खाऊन मन शांत करु शकता. मक्याच्या कणीसात असलेले नैसर्गिक गुणधर्म मन शांत करण्यास मदत करतात.प्रकृतीमध्ये जवळ जवळ 600 प्रकारचे कैराटिनॉयड्स असतात. यामधील केवळ ल्यूटिन आणि जेक्सैथिनच असे कैराटिनॉयड आहेत जे आपल्या मेंदू पर्यंत पोहचतात. हे दोन्ही कैराटिनॉयड्स मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात.

डोळ्यांसाठी अतिशय लाभदायक

ल्यूटिन आणि जेक्सैंथिन डोळ्यांना सुदृढ व निरोगी ठेवण्यास अधिक उपयोगी ठरतात. हे दोन्ही कैराटिनॉयड्स डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं कार्य करतात. हे तत्वं डोळ्यांच्या रेटीनाला स्वस्थ ठेवतात आणि चिरंतर काळासाठी मोतीबिंदूसारख्या गंभीर समस्येपासून दूर ठेवतात. जे लोक मक्याचं कणीस, कीवी, पिकलेलं केळ, पालक, मेथी, कोथिंबीर, पुदीना हे पदार्थ नियमित खातात त्या लोकांना दृष्टी म्हातारपणात देखील अगदी शाबूत राहते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करुन तुम्ही थकला असाल तर मक्याचं कणीस किंवा कॉर्न तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकते.कारण मक्याच्या दाण्यांमध्ये पुरेसे फायबर असते. यासाठी दररोज नास्त्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे खा. त्यामुळे तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील, भूक कमी लागेल आणि अनावश्यक पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात होईल.

गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या सल्लानेच कणीस खावे

गर्भवती महिलांनी भुट्टा, मक्याचं कणीस किंवा स्वीट कॉर्नचं सेवन हे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. कारण बऱ्याचदा गर्भावस्थेत कणीस खाल्ल्याने गर्भपाताची शक्यता वाढते.

You might also like