वात आणि कफावर ‘गुणकारी’ लसूण, जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय स्वयंपाक घरात लसून खूप महत्वाचा आहे. अनेक भाज्या आणि आमटी मध्ये लसूण असला कि जेवणाला चव येते. त्यामुळे अनेक महिला स्वयंपाक करताना लसणाचा वापर हमखास करतात. आजकाल बाजारात लसणाची पेस्ट सुद्धा मिळते. मात्र लसणाचा उग्र वास येत असल्याने तो अनेकांचा नावडता सुद्धा आहे. पण हा लसूण आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

१. रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण खूप उपयोगी आहे.
२. शरीरासाठी गरजेचं असणारं कोलेस्ट्रॉल वाढविण्यास लसूण खूप उत्तम आहे.
३. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसूणमध्ये आहेत.
४. लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
५. लसणामुळे हवेतील रोगजंतू नाहीसे होण्यास मदत होते.
६. लसूण नकारात्मक उर्जा खेचून सकारात्मक उर्जा देते असं म्हटलं जातं. त्यामुळे पूर्वीचे लोक उशीखाली लसून ठेवत असे.
७. लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.
८. पोटात गॅस तयार होत असेल तर लसूण त्यावर प्रतिबंधक आहे.
९. लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.