लसूण खा आणि ‘ह्या’ आजारांना दूर ठेवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सर्वच स्वयंपाक घरात जेवण बनविताना लसणाचा वापर केला जातो. जेवण बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी लसणाशिवाय ते पूर्ण होतच नाही. जगभरात लसूण हा खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून वापरला जातो. कारण, लसणामुळे पदार्थांला चांगली चव येते. लसूण हा जेवणातच वापरला जातो असे नव्हे तर औषध म्हणूनही वापरला जातो. लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात लसणाला खूप महत्व असून त्यास ‘वंडर फूड’ म्हटले जाते. लसणाचा उपयोग औषध म्हणून केला गेला आहे. अशा बहुगुणी लसणाचा वापर आहारात केल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येते.

लसूण हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करते. लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होऊन हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. लसूण खाल्ल्याने उच्चरक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. लसणाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. डायरिया किंवा बद्धकोष्ठ या पोटाच्या दोन्ही विकारांमध्ये लसूण उपयोगी आहे. यासाठी थोडे पाणी उकळायला ठेऊन त्यामध्ये पाच-सहा लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. पाणी साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्यावे. त्यांनतर हे पाणी थोडे कोमट झाले की प्यावे. या लसणाच्या पाण्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठ या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो.

लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे असल्याने इन्फेक्शनमुळे दातदुखी होत असल्यास लसणाची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. यामुळे दातदुखी कमी होते. असा बहुगुणी लसूण आरोग्यासाठी लाभदायक आहे.