‘आम्लपित्ता’पासून तर ‘दातदुखी’पर्यंत ! पेरू खाण्यामुळं मिळतात ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पेरू हे फळ असं आहे जे साधारणपणे अनेकांना आवडतं. फास्टफूड खाण्यापेक्षा फळं खाणं कधीही पौष्टीकच असतं. तरीही आपण फळं खाण्याला प्राधान्य देत नाही. पेरू हे असं फळ आहे जे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

पेरूचं सेवन केल्यानं आपल्या अनेक प्रकारच्या शारीरिक तक्रारी ही दूर होतात. आज आपण पेरू खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याबाबत माहिती घेणार आहोत.

पेरू खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) आम्लपित्ताचा त्रा कमी होतो.

2) भूक वाढण्यास मदत होते. ज्यांना भूक लागत नाही ते याचं सेवन करू शकतात.

3) शरीराचा दाह कमी होतो.

4) ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत तेही याचं सेवन करू शकतात. यानं शौचाला साफ होते.

5) हिरड्यांची सूज, दातदुखी अशा समस्या असतील तर पेरूचं पान चावावं किंवा पानांस रस दुखणाऱ्या भागावर लावावा.

6) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

7) शरीरावर सूज येऊन तो भाग ठणकत असेल तर पेरूच्या पानांचं पोटीस बांधावं.

या काळात करू नये पेरूचं सेवन
1) सर्दी-खोकला अशा समस्या असतील तर पेरू खाऊ नये.

2) पहाटे किंवा रात्री पेरू खाऊ नये.

3) फ्रीजमधील गार पेरू खाऊ नये.

4) कच्चा पेरू खाल्ला तर पोटदुखी होते. त्यामुळ नेहमी पिकलेल्या पेरूचंच सेवन करावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.