चेहऱ्यावर राहिलेत मुरुमाचे काळे डाग, गूळ फेस पॅक आहे त्याचा उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेवल्यानंतर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असल्यास आपण एकतर साखर खाता किंवा गूळ खाता. या दोन्ही गोष्टी अश्या असतात, ज्या घरत सहज उपलब्ध असतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, गुळ हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे चेहऱ्यावर चमक आणते आणि आपल्या सौंदर्यात भर टाकते. जाणून घेऊया गुळाचे फायदे जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

जे लोक गुळ खातात त्यांच्या चेहऱ्यावरील काळे डाग व मुरुम दूर होतात. आपण गुळापासून तयार केलेला फेस पॅक देखील वापरू शकता. एक चमचे टोमॅटोचा रस, अर्धा लिंबू, एक चिमूटभर हळद आणि गूळाबरोबर ग्रीन टी मिक्स करा आणि हे चेहऱ्यावर लावा. आपल्या चेहऱ्यावरील डाग अदृश्य होतील.

गूळ एक प्रकारे अँटी -एजिंग म्ह्णून कार्य करते. हे चेहर्‍यावरील सुरकुत्या काढून त्वचेला टाईट ठेवण्यास मदत करते. गुळामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात. खनिज आणि जीवनसत्त्वे गुळामध्ये आढळतात. हे त्वचेसाठी नैसर्गिक क्लींझरसारखे कार्य करते. जे लोक गुळ खातात, त्यांना बद्धकोष्ठताची समस्या येत नाही. गुळाचा चहा यामध्ये फायदेशीर आहे.