मधुमेहींसाठी अमृतासमान आहे जांभूळ ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह जांभळाचे होतात ‘हे’ 8 मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना माहित नसेल परंतु जांभूळ हे फळ शरीरासाठी अमृतासमान आहे असं सांगितलं जातं. जांभळाच्या सेवनाचे आपल्याला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) जांभळात लोहाचं प्रमाण जास्त असतं. यामुळं शरीरातील रक्त शुद्ध आणि लाल होतं.

2) याच्या सेवनानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3) पोटदुखी, अपचन अशा समस्यांवर जांभळाच्या सरबताचा खूप फायदा होतो.

4) मधुमेहींसाठी तर जांभूळ अमृतासमान आहे. यामुळं शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

5) पोटात मुरड येणं, अतिसार अशा समस्यांमध्ये जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी. हा काढा सकाळी आणि संध्याकाळी 1 कपभर एवढा प्यावा. यामुळं पोटात येणारी कळ थांबून जुलाबही थांबतात.

6) दात आणि हिरड्या कमकुवत झाल्या असतील आणि त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढ्यानं गुळण्या करा.

7) जर आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर जांभळाच्या पानांचा रस आणि गूळ समप्रमाणात घ्या. हे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्याला कापडाचं झाकण लावावं. नंतर याला 4-5 दिवस उन्हात ठेवावं. यानंतर तयार झालेला रस सकाळ संध्याकाळ 2 चमचे घ्यावा. यानं आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

8) मुळव्याध झाला असेल आणि त्यातून रक्त पडत असेल तर दुपारी जेवणानंतर मुठभर जांभळं खावीत. जांभळाचा सरबतही तुम्ही मध घालून पिऊ शकता. हा रस पिल्यानं रक्तस्त्राव थांबतो आणि शौचास साफ होते.

ही सावधनाता बाळगा
– जांभूळ कधीच रिकाम्यापोटी खाऊ नये. असं केलं तर घसा आणि छाती भरल्यासारखी वाटते.
– कच्ची जांभळही कधी खाऊ नयेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.