‘हे’ पान खाल्यामुळे आणता येईल ‘या’ ५ आजारांवर नियंत्रण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेकांना पान खायला खूप आवडते. पण ते फक्त पान खाण्याचे शौकीन म्हणून पान खातात. साधे पान खाण्याने आपल्या आरोग्यास खूप फायदा होतो. पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये किड लागणे, भूक वाढवणे याशिवाय खाल्लेले अन्न पचवणे यासाठी फायदा होतो. याशिवाय पानाच्या रसाचा वापर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यास केला जातो. या पानात प्रोटीन, खनिज, फायबर, कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शिअम, कॅरोटिन, थियामिन, विटॅमिन-सी, नियासिन शरिरास मिळते. जाणून घेऊया पान खाण्याचे इतर फायदे.

१) डोकेदुखी
ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे. अशा व्यक्तींनी पान किसून ज्या जागेवर दुखते तिथे लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

२) सर्दी
अनेकांना हिवाळा आला की, श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी तुम्ही जर मोहरीच्या तेलात पान गरम करून छातीवर ठेवल्यास खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

३) फोडावर उपयोगी
तुम्हाला जर कुठे फोड आला असेल तर त्यासाठी पानाचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी लहान आचेवर पान थोडे गरम करून एरंडेल तेल टाकून फोड झालेल्या जागेवर लावल्यास आराम मिळेल.

४) पानाचा रस
तुम्हाला काही दुखापत झाल्यास पानाचा रस जखमेवर लावला तर तुम्हाला लवकर आराम मिळेल.

५) कंबर दुखी
अनेकांना कंबर दुखीचा त्रास असतो. त्यावर त्यांना काय उपाय करावा कळत नाही. पण कंबर दुखीचा त्रास असणाऱ्यांनी पान तेलात गरम करून त्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो. त्यामुळे पान हे अनेक आजारांवर उपयोगी आहे.

आरोग्यविषयक वृत्त