तुपामुळं वजन वाढतं ? डोळ्यांच्या तक्रारी दूर करून पित्त शमवतं तूप ! जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्याला हे माहितच असेल की, तूप खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते. तूप खाल्ल्यानं रूप येतं ही म्हणंही सर्रास वापरली जाते. तूप खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) तुपाचं सेवन केलं तर पित्ताचा त्रास होत नाही.

2) वात असल्यास तुपाचं सेवन केलं तर तो कमी होतो.

3) डोळ्यावरील ताण कमी होतो.

4) पचनक्रिया सुधारते.

5) अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

6) त्वचेचा पोत सुधारतो आमि रंगही उजळतो.

7) अनेकांना पुरणाचं जेवण केल्यानंतर घशाखाली जळजळ होते किंवा अन्न बाहेर येतं. अशा वेळी पुरणाच्या जेवणात म्हणजेच पुरणपोळी, कटाची आमटी यांच्यासोबत तुपाचं सेवन करावं.

8) तुपामुळं वजन वाढत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.