जाणून घ्या कैरी खाण्याचे ‘हे’ 5 गुणकारी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कैरी आणि आंबा (mango)  हे पदार्थ अनेकांच्या आवडीचे आहेत. कैरीचं विविध प्रकारे सेवन केलं जातं. तुम्हाला माहित आहे का चवीला आंबड गोड असणारी कैरी आरोग्यासाठीही खूप गुणकारी आहे. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) उन्हाळ्यात वातावरणात उष्णता जास्त असते. त्यामुळं कैरीच्या पन्ह्याचं सेवन केलं तर शरीराला थंडावा मिळतो.

2) ज्यांच्या शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त आहे अशा व्यक्तींनी रोजच्या जेवणात मुरांबा, साखरआंबा या पदार्थांचा समावेश करावा.

3) उन्हाळ्यात सतत घाम येतो. त्यामुळं घामावाटे शरीरातील क्षार निघून जातात आणि थकवा जाणवतो. अशा स्थिथीत कैरीचं सेवन करावं. कैरीत सोडियम आणि पोटॅशियम यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांची कमतरता भरून निघते.

4) उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो. यात नाकातून रक्त येतं. अशावेळी कैरीचं सेवन केलं तर फायदा होतो.

5) आजारपणामुळं तोडांची चव गेली असेल तर कैरीची लहानशी फोड खावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.