केशराच्या सेवनामुळं ‘या’ शारीरिक तक्रारी होतात दूर ! जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  केशर (Saffron) हा महागडा पदार्थ असून त्याला खूप मागणीदेखील आहे. कोणत्याही गोड पदार्थाचा रंग, सुवास आणि चव वाढवायची असेल तर केशराचा आवर्जून वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का यामुळं शारीरिक व्याधी देखील दूर होतात. आज आपण केशराचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

1) पदार्थाचा सुवास आणि चव वाढते.

2) स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

3) दम्याचा त्रास कमी होतो.

4) पोटदुखी, अ‍ॅसिडिटी कमी होते.

5) पचनसंस्था सुधारते.

6) शांत झोप लागते.

7) गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर. परंतु गरोदरपणात केशर खाताना त्याची मात्रा कमी असावी.

8) त्वचेसाठीही याचा खूप फायदा होतो.

9) चेहऱ्यावरील फोड, मुरूम, पुटकुळ्या दूर होण्यास याची मदत होते.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.