तोंडाला चव नाही ? आहारात करा चिकूचा समावेश ! जाणून घ्या ‘हे’ 8 महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  गोड असणाऱ्या चिकू या फळात साखरेचं प्रमाण जास्त असतं. अनेकांना हे फळ आवडतं. हे फळ असं आहे जे कोणत्याही ऋतुत सहज उपलब्ध होतं. अनेकजण हे फळ आवडीनं खातात. चवीला गोड असणारं हे फळ आरोग्यासाठीही खूप गुणकारी आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

चिकू खाण्याचे फायदे पुढीप्रमाणे –
1) यात फलशर्करा असतात. त्यामुळं थकवा जाणवल्यास चिकू खावा.

2) अरूची, मळमळ, आम्लपित्त, अतिसार आजारांसाठी उपयुक्त आहे.

3) रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी चिकू खावा.

4) चिकू खाल्ल्यानं आतड्यांची कार्यक्षमता वाढून ती सदृढ बनतात.

5) वारंवार चक्कर येणं, शरीरातील साखर कमी होणं अशा तक्रारी असतील तर चिकूचं सेवन करावं.

6) तापामुळं तोंडाची चव गेली असेल तर चिकू खावा.

7) चिकूचं सेवन केल्यानं शौचाला साफ होते.

8) जुलाब, ताप असल्यास चिकू खावा.

ही काळजी नक्की घ्या
1) मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यां चिकू खावा.
2) कच्च्या चिकूचं सेवन करणं टाळावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.