PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ, जाणून घ्या
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे अनेक फायदे आहेत. एका कर्मचार्याला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत पीएफ योगदानावर प्राप्तीकर कायदा कलम 80सी अंतर्गत प्राप्तीकरात सूट मिळते. याशिवाय असे अनेक फायदे आहेत जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या कर्मचार्यांना प्रदान करते. यामध्ये फ्री इन्श्युरन्स आणि पेन्शन लाभाचा समावेश आहे. पीएफसह मिळणार्या अशाच काही फायद्यांबाबत जाणून घेवूयात…
मोफत वीमा
पीएफ खातेधारक आपल्या सेवाकाळात मृत्यु झाल्यास ईडीएलआय स्कीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्ससाठी पात्र असतो. यापूर्वी हे कव्हर 6 लाख रुपये होते. यासाठी खातेधारकाला वेगळा इन्श्युरन्स प्रीमियम द्यावा लागत नाही.
पेन्शन
पीएफ खातेधारक 58 वर्षाच्या वयानंतर पेन्शनसाठी पात्र होतो. मात्र, पेन्शन घेण्यासाठी पीएफ खात्यात किमान 15 वर्षे नियमित मासिक पीएफ योगदान असावे. पेन्शन लाभ कंपनीच्या योगदानातून मिळतो. कारण कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के पीएफ खातेधारकाच्या ईपीएस खात्यात जातात.
लोन
कर्मचार्याला पीएफमध्ये लोनची सुविधा सुद्धा मिळते. आर्थिक संकटात पीएफ खातेधारक पीएफ बॅलन्सच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकतो. पीएफ लोनवर व्याजदर केवळ एक टक्का असतो. हे लोन कमी कालावधीसाठी असते आणि त्याची पूर्तता लोन मिळाल्याच्या 36 महिन्यांच्या आत करावे लागेल.
अंशत: पैसे काढणे
ईपीएफओ मेडिकल आणि आर्थिक संकट आल्यास खातेधारकाला काही नियम आणि अटींसह अंशत: पैसे काढण्याची परवानगी देते.
गृह कर्जाची परतफेड
कर्मचारी आपल्या पीएफ खात्याचा वापर होम लोनच्या परतफेडीसाठी सुद्धा करू शकतो. ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचारी नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधण्यासाठी आपल्या पीएफ खात्यातील 90 टक्केपर्यंत रक्कमेचा वापर करू शकतो. कर्मचारी आपल्या पीएफ बॅलन्सचा उपयोग करून जमीन सुद्धा खरेदी करू शकतो.