घरामध्ये ठेवा ‘फेंगशुई ड्रॅगन’, दूर होतील सर्व ‘अडचणी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेंग शुईच्या नुसार, घरातील सुख-शांती आणि समृद्धीसाठी बर्‍याच युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक आहे फेंगशुई ड्रॅगन. फेंगशुईचा ड्रॅगन प्रामुख्याने सोनेरी आणि हिरवा रंगाचा असतो. हिरव्या रंगाचा ड्रॅगन आरोग्यासाठी शुभ मानला जातो तर सोनेरी रंगाचा ड्रॅगन आपल्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवितो.

फेंगशुई ड्रॅगनने घरात असते प्रेमळ वातावरण

आपण जर आपल्या कुटुंबात नेहमीच प्रेमळ वातावरण टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असाल तर त्यासाठी खोलीत किंवा घरात सोनेरी रंगाचा ड्रॅगन ठेवा. जर आपली इच्छा असेल तर आपण आपल्या खोलीत ड्रॅगनची जोडी देखील ठेवू शकता. परंतु दोनपेक्षा जास्त ड्रॅगन कधीही ठेवू नका.

ड्रॅगन ठेवण्यासाठी योग्य दिशा

फेंगशुई ड्रॅगन नेहमी लकी डाइरेक्शन मध्ये ठेवावा. जेणेकरून यातून तयार होणारी सकारात्मक उर्जा घरात चांगल्या प्रकारे पसरेल. ड्रॅगन ठेवताना हे लक्षात ठेवावे की ड्रॅगनचे तोंड भिंतीकडे नसावे.

फेंगशुई ड्रॅगन ठेवताना घ्यावयाची खबरदारी

आपण या लकी गॅजेटला घराच्या कोणत्याही कोपर्यात ठेवू शकतात. परंतु गॅरेज, स्नानगृह किंवा स्टोअररूममध्ये यास ठेऊ नका. असे मानले जाते की एकापेक्षा जास्त ड्रॅगन घरात ठेवू नये, यामुळे त्याचा घरावर चुकीचा प्रभाव पडत असतो.

फेंगशुई ड्रॅगन घरात ठेवल्याने होणारे फायदे

– फेंगशुई ड्रॅगन प्रेम आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. आपल्या सामान वयोगटातील लोकांना दिल्यास परस्पर प्रेम वाढत असते. तसेच ते आपल्या वयापेक्षा मोठ्यांना दिले तर त्यांचे अपार आशीर्वाद मिळतात.

– जर आपण ते आपल्या मुलांच्या खोलीत ठेवले तर त्यांच्या मनात वडिलधाऱ्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण होते. हे आपल्या मुलांना नकारात्मक उर्जापासून देखील वाचवते.

– आपले कुटुंब नेहमी आनंदाने असावे आणि आपल्याला कधीही पैशासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू नये तर ड्रॅगन आपल्या घराच्या पूर्वेकडील बाजूस ठेवा.

फेंगशुई ड्रॅगनशी संबंधित या काही खास गोष्टी होत्या. ज्यांना आपण फॉलो केले तर जीवनातल्या अनेक संकटांतून मुक्तता मिळू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like