Benefits Of Filing ITR | ‘इन्कम टॅक्स’च्या कक्षेत नसाल तरीही दाखल करा ITR, मिळतात अनेक फायदे

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरणाच्या बाबतीत अनेक लोकांचा असा समज असतो की, ज्यांची कमाई कराच्या कक्षेत येते तेच आयटीआर फाइल (Benefits Of Filing ITR ) करतात. पण तसे नाही. कराच्या कक्षेत येत नसला तरीही टॅक्स रिटर्न भरला पाहिजे, कारण ITR भरण्याचे अनेक फायदे आहेत. (Benefits Of Filing ITR )

 

उत्पन्नाचा दाखला बनवताना फायदा (Advantages of making proof of income)

इन्कम टॅक्स रिटर्न पात्र नसलात तरीही ते भरावे कारण त्यातून अनेक फायदे मिळू शकतात. आयटीआर दाखल करणार्‍यांना कर्ज, टॅक्स रिटर्न सहज मिळू शकतो. उत्पन्नाचा दाखला बनवताना फायदा होतो. अशाप्रकारे, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा फायदा टॅक्स रिटर्न भरणार्‍यांना होतो.

 

उत्पन्नाचा आणि रहिवासी पुरावा (Proof of income and residency)

आयटीआर वैध उत्पन्नाचा पुरावा म्हणून उपयोगी आहे. ते वैध रहिवासी पुरावा म्हणून देखील उपयोगी आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर आयटीआर उपयोगी येतो. एखाद्या सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी मागील 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक असतो. (Benefits Of Filing ITR )

 

सहज कर्ज मिळवा (Get a loan easily)

टॅक्स रिटर्न भरला तर कर्ज सहज मिळू शकते. कारण कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बँक किंवा फायनान्स कंपनी उत्पन्नाचा तपशील पाहते. आयटीआरमध्ये उत्पन्नाचा तपशील असतो. ITR वरून किती कर्ज द्यायचे हे बँक ठरवते. यासाठी वेळेवर आयटीआर भरल्यास कर्ज मिळणे सोपे होते. गृहकर्ज, कार लोन किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.

 

टॅक्स रिटर्न

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या बचत योजनांमधून मिळणार्‍या व्याजावर कर सवलत मिळते. उत्पन्न एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून असल्यास, आणि जर ते रु. 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर कपात केलेल्या टीडीएसवर पुन्हा दावा करू शकता.

 

विम्यासाठी देखील आवश्यक (Also required for insurance)

विमा कव्हर जास्त ठेवण्याच्या अटीवर, किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या टर्म प्लानवर इन्श्युरन्स कंपन्या ITR पाहतात.
उत्पन्नाचा स्रोत आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी कंपन्या ITR मागतात.

 

शेअर्स गुंतवणूक करणार्‍यासाठी (Shares for investors)

शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍यासाठी सुद्धा आयटीआर एक चांगला स्रोत आहे.
नुकसान झाल्यास, तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेण्यासाठी विहित मुदतीत आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.
पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत समायोजित केला जाईल आणि तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल.

 

व्हिसा मिळणे सोपे (Easy to get a visa)

आयटीआरच्या आधारे व्हिसा मिळणे सोपे जाते. अनेक देश व्हिसासाठी आयटीआरची मागणी करतात.
ज्याद्वारे व्हिसा प्रक्रियेत अधिकार्‍यांना व्यक्तीची सध्याची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाची माहिती मिळते.

 

Web Title :- Benefits Of Filing ITR | benefits of filing itr even income is not taxable income tax return last date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा