Benefits Of Grapes | द्राक्षांचं सेवन आरोग्यासाठी विशेष फायदेशीर, ‘या’ आजारांचा धोका कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Grapes | कोणत्याही ऋतू असो शरीर निरोगी ठेवायचे असेल तर फळे (Fruits) आणि पालेभाज्या (Leafy Vegetables) खाल्ल्याच पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. या दिवसात द्राक्षे (Grapes) मोठ्या प्रमाणात येतात. अँटीऑक्सिडेंट्स (Antioxidants), फायबर (Fiber) आणि इतर अनेक पोषक द्रव्ये या द्राक्षात असतात. म्हणून तर कोरोनाच्या काळात इम्युनिटी पॉवर (Immunity Power) म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नित्य द्राक्षे खाण्याचा (Benefits Of Grapes) सल्ला दिला जात होता.

 

वजन कमी करण्यापासून (Weight Loss) ते हृदयरोगापासून (Heart Disease) बचाव करण्यापर्यंत करण्यात येणार्‍या सर्व उपायांममध्ये द्राक्षे खाण्याचा उपाय (Benefits Of Grapes) खुप फायदेशीर ठरत आहे, असे आहार तज्ज्ञांच्या संशोधनातून आढळून आले आहे. जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजांव्यतिरिक्त (Minerals), द्राक्षांमध्ये फायबर देखील पुरेसे प्रमाणात असते, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

 

इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय खावं (Immune-Boosting Foods)
सध्याच्या कोरोनाच्या या काळात आपण सर्वजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणार्‍या गोष्टींचा अधिकाधिक वापर करत आहोत. अशा परिस्थितीत द्राक्षे खाणे हा एक रामबाण उपाय म्हणायला हवा. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) चे प्रमाण जास्त असलेले अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या पेशींना हानिकारक बॅक्टेरिया (Bacteria) आणि विषाणूंपासून (Virus) वाचविण्यात मदत करतात. व्हिटॅमीन सी चे दररोज सेवन करणार्‍यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे निष्कर्ष सध्या होत असलेल्या अनेक संशोधनातून बाहेर आले आहेत.

वजन कमी करण्याचा आहार (Weight Loss Diet)
द्राक्षांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते सेवन केल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते, इतर काही खाण्याची इच्छा होत नाही. द्राक्षांमध्ये कॅलरी (Calories) कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यासाठी आपल्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. अधिक वजन असलेल्या ९१ जणांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले. जे लोक जेवणापूर्वी ताज्या द्राक्षांचे सेवन करत होते. त्यांचे वजन वाढण्याचे प्रमाण कमी झाले.

 

विशेषत: हृदयरोग टाळण्यासाठी काय करावे (What To Do To Prevent Heart Disease) ?
हृदयरोगाचा धोका कसा कमी करता येईल, यासाठी केलेल्या अभ्यासामध्ये द्राक्षाचे सेवन (Grapes Intake) फायदेशीर मानले गेले.
द्राक्षाचे सेवन नियमितपणे केल्याने उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य (Heart Health) सुधारते.
या अभ्यासात काही लोकांनी सहा आठवड्यांसाठी दररोज तीन वेळा द्राक्षाचे सेवन केले त्यांच्या रक्तदाबात लक्षणीय घट दिसून आली.
द्राक्षांमध्ये असलेले महत्त्वपूर्ण पोषक द्रव्ये हृदयाचे कार्य (Heart Function) अधिक चांगल्या प्रकारे सुरू राहण्यासाठी महत्त्वाची ठरतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Grapes | grape fruit benefits for health angoor angur khanyache fayde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Beed Crime | बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांसह तिघे ताब्यात

 

Ahmednagar District Hospital Fire Case | पोलीसनामा इम्पॅक्ट ! अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना ‘त्या’ प्रकरणात अटक

 

Advocate Umeshchandra Yadav-Patil | प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त