Benefits Of Lemon Water : दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने पचनशक्ती आणि इम्यून सिस्टम होईल मजबूत, होतील ‘हे’ जबरदस्त 9 फायदे!

इम्यूनिटी वाढवण्याचे नैसर्गिक उपाय जर तुम्ही शोधत असाल तर लिंबू (lemon) पाणी हे घरगुती ड्रिंक चमत्कारिक ठरू शकते. हे पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होऊ शकते आणि पोटाच्या अनेक समस्या दूर राहू शकतात. लिंबू(lemon)त व्हिटॅमिन सी आणि बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट सारखे औषधी गुण भरपूर असतात. यामुळे पोटातील गडबड, डायबिटीज आणि लिव्हरसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी लाभादायक आहे. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…

1. इम्यूनिटी वाढते
रोज सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने इम्यूनिटी वाढते. यामध्ये बॉयोफ्लेवोनॉईड, व्हिटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रियंट्स भरपूर असतात, ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते.

2. पचनशक्ती सुधारते
लिंबूत हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड असल्याने पचनशक्ती सुधारते. अ‍ॅसिडीटी दूर होते.

3. एनर्जी बूस्ट
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने थकवा आणि जडपण दूर होतो. शरीरात उर्जेचा स्तर वाढतो. ताजेपणा जाणवतो.

4. वजन घटते
कोमटपाण्यात एक लिंबू पिळा आणि एक चमचा मध मिसळा. रोज हे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. एक्स्ट्रा फॅट कमी होते, मेटाबॉलिज्म वाढते.

5. त्वचा होईल चमकदार
शरीरातील विषारी घटक बाहेर पडल्याने त्याचा प्रभाव त्वचेवर पडतो आणि त्वचा तजेलदार होते. त्वचेवरील सुरकुत्या, ब्लॅकहेड आणि पिंपल दूर होतात.

6. किडनी स्टोनपासून दिलासा
सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोक कमी होतो.

7. डायबिटीज राहतो नियंत्रणात
याच्या नियमित सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहाते. डायबिटीजच्या रूग्णांसाठी हा जबरदस्त उपाय आहे.

8. इन्फेक्शन होईल दूर
या ड्रिंकमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅथमन सी भरपूर असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे विविध प्रकारचे इन्फेक्शन दूर राहाते.

9. हाय ब्लड प्रेशर राहाते नियंत्रणात
रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होण्यास मदत होते.