आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे आरोग्याच्या दूर करण्यास ही पाने उपयोगी ठरतात. आयुर्वेदात या पानांना खूप महत्व आहे. विविध आजारांवर या पानांचा उपयोग केला जातो. लिंबाच्या पानांच्या १० फायद्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत. लिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुण असतात. याची पेस्ट बनवून त्वचेवर लावल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो.

वजन कमी करण्यासाठी ही पाने खूपच परिणामकारक आहेत. आठवड्यातून ३ किंवा ४ वेळा लिंबाच्या पानांचा ज्यूस प्यावा. मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. नियमित लिंबाच्या पानांचा ज्यूस प्यायल्याने इंसुलिन लेवल बॅलेंस होऊन डायबिटीजपासून आराम मिळतो. दात निरोगी राहण्यासाठी नियमित लिंबाची पाने ५ मिनिट दातांवर घासावी. यामुळे दातांचे बॅक्टेरिया नष्ट होतील आणि तोंडाची दुर्गंधी दूर होईल. शिवाय ताप आल्यावर लिंबाच्या पानांचा काढा बनवून प्यायल्यास आराम मिळतो. यामधील अँटीव्हायरल गुण इम्युनिटी वाढवतात.

लिंबाची पाने उकळून घ्यावीत. कोमट झाल्यावर याने केस धुवावेत. यामधील अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुण कोंडा दूर करते. यासोबतच केस काळे, दाट आणि मजबूत होतात. आठवड्यातून ३-४ वेळा लिंबाची पाने उकळून याची पेस्ट बनवून त्वचेवर लावावी. यामुळे स्किन मॉइश्चराइज होईल आणि सुरकूत्या कमी होतील. लिंबाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात. हे पिऊन जखमेवर लावल्याने जखम ठिक होते आणि डाग दूर होतो. पिंपल्स दूर करण्यासाठी लिंबाच्या पानांची पेस्ट दह्यामध्ये मिसळून पिंपल्सवर लावावी. यामधील अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी पिंपल्सची समस्या दूर करतात. लिंबाच्या पानांची पेस्ट नियमित त्वचेवर लावावीत. यामधील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल तत्त्व त्वचेला क्लीन करतात. यामुळे ब्लॅक हेड्सची समस्या दूर होते.