Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Nuts | शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना प्रतिकार करण्यासाठी आहारतज्ज्ञ पालेभाज्या, फळे किंवा सुका मेव्यासारखे (Leafy Vegetables, Fruits Or Dry Fruits) पौष्टिक तत्व सेवन करायला सांगतात. भरपूर पालेभाज्या, फळे खाऊन जेवढी जीवनसत्व (Vitamins) आणि प्रथिने (Proteins) मिळतात. त्यापेक्षा जास्त पौष्टिक तत्वे मूठभर सुकामेवा खाल्याने मिळतात. सुका मेवा खाल्ल्याने शरीर निरोगी तर राहतेच शिवाय विविध प्रकारच्या आजारांचा धोका देखील कमी होतो. काजूमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ते शरीराला सामर्थ्यवान आणि रोगमुक्त ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. बदाम, अक्रोड, काजू, मनुका (Almond, Walnut, Cashew, Raisins) यासारखा सुका मेवा म्हणजे जीवनसत्व आणि प्रथिनांचे (प्रोटिन्स) पॉवरहाऊस मानले जाते (Benefits Of Nuts).

 

दररोज मूठभर सुका मेवा खाल्ल्याने शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध पौष्टिक पदार्थांची सहज भरपाई होऊ शकते. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी (Physical And Mental Health) फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. ब्राझीलच्या शेंगदाण्यात दररोज आवश्यक असणारे सेलेनियम (Selenium) मिळते. मेंदूची शक्ती (Brain Power) वाढवण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी अक्रोड, बदाम यासारखी सुकी फळे प्रभावी मानली जातात (Benefits Of Nuts). चला जाणून घेऊया दररोज सुका मेवा खाण्याचे आरोग्य फायदे (Let’s Know The Health Benefits Of Eating Dry Fruits Every Day).

 

काजूमध्ये भरपूर पोषक द्रव्य (Cashews Are Rich In Nutrients) –
काजूमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या ड्रायफ्रूट्सपैकी काजू हे सर्वात शक्तीशाली फळ आहे. नट्समध्ये पॉलीफेनॉलसह (Polyphenol) अनेक आवश्यक अँटिऑक्सिडेंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास उपयुक्त म्हणून ओळखले जातात. मुक्त रॅडिकल्स शरीराच्या पेशींना नुकसान पोहोचवून विविध प्रकारच्या आजारांचा धोका वाढवतात. एका अभ्यासात असे आढळले आहे की अक्रोडमध्ये माशांपेक्षा मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्याची क्षमता जास्त असते.

काजूचे फायदे (Benefits Of Cashew) –
मधुमेहींनी काजूचे जरूर सेवन करावं. मधुमेहाच्या समस्येमध्ये बर्‍याच प्रकारचे काजू फायदेशीर आहेत. टाइप -२ मधुमेह (Type-2 Diabetes) आणि पाचनक्रियेचा धोका कमी करून हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका (Heart Disease, Stroke And Risk Of Diabetes) कमी करण्यासाठी काजू फायदेशीर असल्याचे आढळले आहे. काजूत कार्बचे प्रमाण कमी असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढू देत नाहीत.

 

पचनशक्तीला चालना (Digestion Gets a Boost) –
पचनक्रिया चांगली राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात व्हायला हवे.
फायबरसाठी काजूचे सेवन चांगले मानले जाते. हे आपल्या आतड्यांमधील निरोगी बॅक्टेरिया वाढवितात.
यामुळे अन्नातून पोषक द्रव्यांचे शोषण करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो.
आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारून मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Nuts | suka meva khanyache fayde benefits of nuts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | भाजपचा टोला; म्हणाले – ‘त्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव केला असता तर..’

 

PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

 

CM Uddhav Thackeray | रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच ! CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र