जाणून घ्या, केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 18 जानेवारी : फॅशन आणि स्टाईलसाठी आपण केसांवर अनेक प्रयोग करतो. अनेक केमिकल उत्पादनांचा वापर देखील करतो. पण या सगळ्या नादामध्ये केसांच्या मुळांना तर त्रास होतोच. पण केस अतिशय कमकुवतही होतात. त्यात वरून प्रदूषणामुळे केसांना अधिक त्रास होतो आणि केस निस्तेज होतात. अशावेळी नैसर्गिक उपाय म्हणून केसांसाठी उपयुक्त ठरते ते म्हणजे ऑलिव्ह ऑईल (olive oil ). ऑलिव्ह ऑईल (olive oil ) हे ऑलिव्ह या फळापासून काढले जाते. हे वेगवेगळ्या रिफाईंड प्रक्रियेतून तयार होते.

व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल – प्रति किलो व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये 150 ते 400 मिलिग्रॅम प्रमाणात पॉलिफिनॉल आढळते.

रिफाईंड ऑलिव्ह ऑईल – हे सर्वात कमी गुणवत्ता असणारे ऑलिव्ह तेल समजण्यात येते.
ऑलिव्ह ऑईल – हे सर्वात शुद्ध तेल मानले जाते. हे नॉनव्हर्जिन असते. रिफाईंड ऑलिव्ह ऑईल आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचे हे मिश्रण असते.

पोमेस ऑलिव्ह ऑईल – हे ऑलिव्ह ऑईल पहिले गुदा आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलने तयार करण्यात येते.

केसांसाठी तुम्ही अधिक व्हर्जिन अथवा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळते.

केसांसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे :
केसांच्या अनेक समस्या असतात आणि या समस्यांवर ऑलिव्ह ऑईल हा उत्तम तोडगा असून ऑलिव्ह ऑईल सौंदर्यासाठी फायदेशीर आहे. स्काल्प उत्तम राखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, केसांंच्या अनेक समस्यांना सामोरं जावे लागते. ऑलिव्ह ऑईलमुळे ही समस्या दूर होते.

कोंडा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करू शकता. यात मॉईस्चराईंजिंग गुण असल्याने केसांवर ऑलिव्ह ऑईलचा सकारात्मक प्रभाव पडतो. यात अँटिऑक्सिडंट गुण आणि फ्री रॅडिकल्सपासून सुटका देणारे गुण असल्याने वयाच्या आधी केस पांढरे होण्याचे प्रमाण रोखण्यास ऑलिव्ह ऑईलची मदत मिळते.
केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून ऑलिव्ह ऑईलचा उपयोग होतो. यात असणारे इमोलिएंट आणि तैलीय गुण हे नैसर्गिक कंडिशनर स्वरूपात काम करतात. केसगळती समस्येतून सुटका करण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईलची मदत घेऊ शकता.
ऑलिव्ह ऑईलच्या गुणांमुळे याचा उपयोग प्री शँपू ट्रिटमेंटप्रमाणे केला जातो.

ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे तेल :
लागणारे साहित्य : दोन चमचे नारळाचे तेल, दोन चमचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि गरम टॉवेल.

अशी आहे वापरण्याची पद्धत :
दोन्ही तेल एकत्र करून गरम करा आणि त्यानंतर केसांच्या मुळापासून लावावे.
10-15 मिनिट्स मसाज करा. यानंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि पिळून पाणी काढून टाकावे. हा गरम टॉवेल डोक्यावर ठेवा आणि अर्धा तास तसंच राहू द्या.
नंतर शँपूने केस धुवावे.

मध आणि ऑलिव्ह ऑईल
लागणारे साहित्य : अर्धा कप मध, पाव कप व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि एक विटामिन ई कॅप्सुल

अशी आहे वापरण्याची पद्धत :
एका बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. 15 सेंकदासाठी मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घ्या. केसांना शँपू लाऊन धुवावे. त्यानंतर हे मिश्रण थोड्याशा ओलसर केसांमध्ये अगदी मुळापासून लावावे.

अंडे आणि ऑलिव्ह ऑईल
लागणारे साहित्य : दोन अंड्याचा आतला भाग (कोरड्या केसांसाठी) व दोन अंड्यांचा सफेद भाग (तेलकट केसासाठी) अथवा एक पूर्ण अंडे (सामान्य केसांसाठी)
दोन चमचे ऑलिव्ह ऑईल

अशी आहे वापरण्याची पद्धत
एका बाऊलमध्ये अंडे घेऊन व्यवस्थित फेटा आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून घ्यावे. केस शँपूने नीट धुवा आणि सुकवा. त्यानंतर थोड्याशा ओल्या केसांमध्ये मिश्रण लावा आणि केस बांधून ठेवावे. साधारण अर्ध्या तासानंतर सुकल्यावर शँपूने केस धुवावे.

अव्हाकॅडो आणि ऑलिव्ह ऑईल
लागणारे साहित्य : एक उकडलेले अव्हाकॅडो, एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि शॉवर कॅप

अशी आहे वापरण्याची पद्धत :
अव्हाकॅडोचा आतला उकडलेला भाग काढून ब्लेंड करून घ्यावे. एकदम घट्ट पेस्ट झाली तर त्यात दोन ते तीन चमचे पाणी मिक्स करावे. ही पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात ऑलिव्ह ऑईल तेल मिक्स करा केस धुवा आणि पुसल्यावर थोडे ओलसर राहू द्या. यावर ही पेस्ट लावा आणि शॉवर कॅपने झाका एक तासानंतर केस थंड पाण्याने शँपू लाऊन धुवा आणि हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता

केळे आणि ऑलिव्ह ऑईल
लागणारे साहित्य : एक उकडलेले केळे, एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल आणि शॉवर कॅप

अशी आहे वापरण्याची पद्धत :
केळे मॅश करून घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे.
केस धुवा आणि पुसल्यावर थोडे ओलसर राहू द्या. यावर ही पेस्ट लावा आणि शॉवर कॅपने झाका. ही पेस्ट संपूर्ण केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग थंड पाणी आणि शँपूने धुवावे.

ऑलिव्ह ऑईल हेअर मास्क लावल्याने तुमच्या केसांना नक्कीच फायदा मिळतो. पण काही गोष्टींची काळजी घेणंही अत्यंत गरजेचे आहे. तुमचे केस जर कोरडे असतील तर त्यासठी तुम्ही सल्फेट फ्री शँपूचा वापरावा. केस नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. हेअर मास्क लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवावे.

विचारण्यात येणारे प्रश्न :
1. केसांसाठी ऑलिव्ह ऑईल का वापरावे?
इतर तेलांच्या तुलनेत केसांना अधिक चांगले पोषण देण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करत असते.

2. ऑलिव्ह ऑईलसह मेयोनीज हेअर मास्क केसांसाठी चांगला आहे?
तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मेयोनीजचा हेअर मास्क वापरू शकता. यात अँटिइफेक्टिव्ह गुण असल्यामुळे केसगळती होण्यापासून मदत मिळते.

3. ऑलिव्ह ऑईलचा वापर हा नैसर्गिक घटकांमध्ये येतो का?
होय, ऑलिव्ह ऑईलचा वापर हा नक्कीच नैसर्गिक घटकांमध्ये येतो. ऑलिव्ह ऑईल हे केसांसाठी फायदेशीर ठरते.