Benefits of Onion | उन्हाळ्यात कांदा खाल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Onion | कांदा ही व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्यात कमी कॅलरीज आणि अधिक पोषक तत्वे असल्याने शरीराला ते उपयुक्त (Benefits of Onion) असते. त्याचबरोबर कांद्यामध्ये व्हिटॅमिन-बी (Vitamin-B), फोलेट (B9) आणि पायरिडोसिन (Pyridosine) (B6) पुरेशा प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरातील चयापचय, मज्जातंतूंचे कार्य आणि लाल रक्तपेशी वाढवण्याचे काम करतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, सल्फर, प्रथिने आणि खनिजे (Potassium, Magnesium, Fiber, Carbohydrates, Sulfur, Protein and Minerals) यांचा देखील एक बेस्ट स्रोत आहे. तर कांद्याचे नेमके फायदे काय आहेत? ते जाणून घ्या.

 

कांद्याचे फायदे काय?

– रक्तातील साखर चांगली राहते (Blood Sugar Stays Good)
कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्याचे काम करत असते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की लाल कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी (Glucose levels) कमी होते. त्याचबरोबर, ते शरीरात हायपोग्लाइसेमिक (Hypoglycemic)तयार करतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार पूरक म्हणून काम करू शकतात. (Benefits of Onion)

 

– शरीराला थंडावा मिळतो
कांद्याचा दुसरा फायदा म्हणजे कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने आपल्याला थंडावा मिळतो, उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत देखील होते.

– उष्माघातापासून संरक्षण (Protection From Heatstroke)
उन्हाळ्यात उष्मा येण्याची शक्यता खूप अधिक असते, म्हणून तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. अशा परिस्थितीत कांद्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. तसेच कांद्यामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवता येते, तसेच, कांद्याचे सेवन केल्याने तुम्हाला उष्णता कमी वाटते.

 

– कॅन्सरची शक्यता कमी (Less Likely To Get Cancer)
कांदा आणि लसूण यांसारख्या एलिअम भाज्यांचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. PubMed च्या संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक एलियम भाज्यांचे सेवन करतात ते कॅन्सरपासून लवकर बरे होऊ शकतात.

 

– कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राहते (Cholesterol Levels Remain Good)
कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) तुम्हाला जळजळीशी लढण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकार (Heart Disease) होण्याची शक्यता खूप कमी होते. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रणात (Blood Pressure Control) ठेवण्यास मदत होते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Benefits of Onion | benefits of onion in summer it is good to eat raw onion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Liver Problem | एक्सपर्टकडून जाणून घ्या लिव्हरमध्ये कोणत्या कारणामुळे येते सूज, यापासून बचाव आणि उपचार

 

Maharashtra Government Relaxes Covid Restrictions | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले, जाणून घ्या मास्क मुक्तीबाबत काय झालं ?

 

Skincare Tips | उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ आणि उजळ बनवण्यासाठी ट्राय करा ‘या’ 5 गोष्टी; जाणून घ्या