५० हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय ; सरकार देणार ९० टक्के कर्जासह ३५ टक्के सबसिडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांत बॅटरीच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वाहने आणि इनव्हर्टरमध्ये जोडल्या जाणाऱ्या बॅटरीला काही महिन्यांनंतर चार्ज करण्याची गरज असते. यासाठी लागणारे पाणी भिन्न प्रकारचे आहे. ही बॅटरी ऑटोमोबाईल मार्केट बरोबरच जवळजवळ प्रत्येक बाजारपेठेत विकली जाते. आपण व्यवसायासाठी अधिक पैसे खर्च न करता व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास आपण बॅटरी वॉटर उत्पादन संयंत्र प्रकल्प सुरु करू शकता.

५० हजार रुपये करा गुंतवणूक

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत, या व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. तुमच्याकडे फक्त ५० हजार रुपये असल्यास तुम्ही हा प्रकल्प सुरु करू शकता. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च हा ४ लाख ७० हजार रुपये आहे. सरकार यासाठी तुम्हाला ९० टक्के कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे .

प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणारी उपकरणे :

बॅटरी वॉटर प्लांट सुरु करण्यासाठी तुम्हाला हॉट एअर ब्लोअर, प्लॅस्टिक ड्रम, वॉटर लिफ्टिंग पंप, हार्डनेस टेस्टिंग किट, पीएच मीटर, सेमिओमेटोमिक फिलिंग मशीन, १ एचपी मोटर, क्वालिटी कंट्रोल इक्विपमेंटवर सुमारे २ लाख २५ हजार रुपये खर्च करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला २ लाख ४५ हजार रुपये खेळते भांडवल म्हणून ठेवावे लागतील. अश्या प्रकारे तुमच्या प्रकल्पाची एकूण किंमत ४ लाख ७० हजार रुपये होईल .

वर्षाला होईल इतकी कमाई :

प्रकल्प सुरु केल्यानंतर तुम्हाला वर्षभरात कच्च्या मालासाठी सुमारे ९ लाख रुपये लागतील. यामुळे तुमचे संपूर्ण भांडवल १३ लाख ७० हजार रुपये होईल . एका वर्षात तुम्ही २५० किलो बॅटरी पाण्याची निर्मिती करू शकाल. याची विक्री करून तुम्हाला १६ लाख रुपये मिळतील. सर्व खर्च वगळता तुम्हाला १ लाख २९ हजार रुपये निव्वळ नफा मिळेल .

मिळेल इतकी सबसिडी

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही कर्ज घेतल्यास तुम्हाला २५% सबसिडी मिळू शकेल. शहरी भागात १५ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के सबसिडी दिली जाते. तर विशेष श्रेणीमधील लोकांना २५% आणि ३५% सबसिडी मिळू शकते .

Loading...
You might also like