झोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन – स्मार्टफोनपासून एका क्षणाचे अंतरही सहन करू शकत नाही? झोपण्याच्या आधी फोनवर फेसबुक-इन्स्टाग्राम चेक केल्याशिवाय समाधान होत नाही? जर असे तुमच्याबाबतीत होत असेल तर सावध व्हा. यूकेच्या एक्झीटरसह अनेक विद्यापीठांच्या अभ्यासांमध्ये मोबाईलमधून निघणाऱ्या विकिरणांना कर्करोगापासून ते नपुंसकत्व होण्याच्या जोखमीशी जोडले गेले आहे.

निद्रानाश
2017 मध्ये इस्राईलच्या हायफा युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात झोपण्याच्या अर्धा तास आधी स्क्रीन वापरणे थांबविण्याचा सल्ला देण्यात आला होता. संशोधकांनी सांगितले की स्मार्टफोन, संगणक आणि टीव्ही पडद्यामधून निघणारा निळा प्रकाश ‘स्लीप हार्मोन’ मेलाटोनिनच्या उत्पादनात अडथळा आणतो. यामुळे व्यक्तीला केवळ झोपण्यातच अडचण येत नाही तर सकाळी उठल्यावर थकवा, अशक्तपणा आणि जडपणा देखील जाणवतो.

कर्करोगाचा धोका
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन एजन्सीने मोबाइल फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरणांना संभाव्य कार्सिनोजेन (कार्सिनोजेनिक घटक) म्हणून वर्गीकृत केले आहे. एजन्सीने असा इशारा दिला आहे की स्मार्टफोनचा जास्त वापर हा मेंदू आणि कानाच्या ट्यूमरला कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

मूल न होण्यास कारणीभूत
2014 मध्ये प्रकाशित झालेल्या एक्झीटर विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये मोबाइल फोनमधून उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचा नपुंसकतेवर थेट संबंध आढळला. संशोधकांनी सावध केले की पॅन्टच्या खिशात स्मार्टफोन ठेवल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे मुलबाळ होण्याच्या सुखापासून देखील वंचित राहावे लागू शकते.

स्मार्टफोनचा पेट होणे किंवा स्फोट होणे
– जुलै 2014 :
डालासमध्ये उशीखाली स्मार्टफोनला ठेऊन झोपलेल्या एका 13 वर्षीय मुलीच्या फोनला आग लागली.
– मे 2015 : कनेक्टिकटमध्ये बेडवर फोन ठेवून चार्ज करणाऱ्या मुलाचा फोन आणि बेड दोघेही जळाले.
– जून 2018 : क्वालालंपूरमध्ये गाढ झोपेत असलेला तरुण स्मार्टफोनचा स्फोट झाल्यामुळे जळाला, उपचारादरम्यान तोडला दम

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like