Benefits of Ragi in winter | हिवाळ्यात नाचणीचा वापर केल्यास दूर होते सांधेदुखी, इतर ४ फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Ragi in winter | नाचणीला फिंगर मिलेट किंवा रागी म्हणून ओळखले जाते, हे हिवाळ्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. नाचणी शरीर उबदार ठेवण्यास उपयुक्त आहे. नाचणी हे हाय फायबरयुक्त धान्य आहे, जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध आहे. तसेच नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ती पॉलिश केलेली किंवा प्रक्रिया केलेली नसल्याने शुद्ध स्वरूपात वापरता येते. हिवाळ्यात सांधेदुखीसारख्या अनेक समस्यांचा धोका वाढतो. नाचणीचे सेवन केल्याने या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. नाचणीचे इतरही अनेक आरोग्यदायी जाणून घेऊया. (Benefits of Ragi in winter)

 

हिवाळ्यात नाचणी खाण्याचे फायदे (Benefits of Ragi in winter)
हेल्थलाइनच्या मते, नाचणी हे न्यूट्रिएंट डेन्स आणि व्हर्सटाईल धान्य आहे, जे विशेषतः कोरड्या, उष्ण हवामानात आणि हाय अल्टीट्यूडवर पिकवले जाते. अनेक वर्षांपासून ते लाखो लोकांसाठी पोषणाचा प्राथमिक स्त्रोत आहे. हिवाळ्यात नाचणीचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूया.

१. अँटी-एजिंग
नाचणीमध्ये फिनोलिक अ‍ॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. यामुळे हिवाळ्यात त्वचा फ्रेश आणि चमकदार राहते.

 

२. डायबिटीजसाठी उत्तम –
नाचणीमध्ये भरपूर फायबर आणि पॉलिफेनॉल असतात. इतकेच नाही तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे हिवाळ्यातही डायबिटीज रुग्णांची पचनक्रिया बरोबर राहते आणि अन्नाची लालसा कमी होते. ब्लड शुगर लेव्हल योग्य ठेवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी ती उपयुक्त आहे.

 

३. हाडांसाठी फायदेशीर
हे धान्य थंडीच्या वातावरणात हाडांच्या समस्यांपासूनही वाचवू शकते. इतर धान्यांच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ती हाडांसाठी फायदेशीर मानली जाते.

 

४. टॉक्सीन शरीराच्या बाहेर काढते –
नाचणीमध्ये डाएट्री फायबरचे प्रमाण भरपूर असते, अयोग्यरित्या प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे रक्तवाहिन्या बंद होतात त्या मोकळ्या करण्यास मदत करते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits of ragi in winter Use of ragi in winter relieves joint pain, know other 4 benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान