काळे ‘मनुके’ खाण्याचे ‘हे’ ७ फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मनुका किंवा किशमिश हे फक्त खीर, शिरा, पुलावामध्ये स्वाद वाढवण्यासाठीच मर्यादित नसून त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. मनुके हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे आपण रोज कमीत कमी ५ मुनके खाणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुका खाण्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

१) मनुका खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मनुक्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
२) हृद्यविकाराचा त्रास असल्यास त्यात मनुका फायदेशीर आहेत.
३) मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
५) मनुकांमधील अँटीऑक्सिंड्टसमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून वाचता येते. यातील गुणांमुळे सर्दी-खोकला बरा होऊ शकतो.
६) मनुकांमधील कॅरोटिन द्रव डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
७) यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. दररोज मनुका खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स दूर होऊन केसगळतीची समस्याही दूर होते.

आरोग्यविषयक वृत्त –