Benefits Of Raw Banana | कच्च्या केळ्यांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, चेहर्‍यावरील सुरकुत्याही दूर होतात; जाणून घ्या कशा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Raw Banana | कच्च्या केळीचे सेवन (Eat Raw Banana) केल्याने पाचन क्षमता (Digestive Capacity) सुधारण्यास मदत होते. यात फायबर (Fiber) आणि प्रतिरोधक स्टार्च (Resistant Starch) असतात. हे दोन्ही घटक पचनसंस्थेची क्षमता वाढवतात तसेच अन्न लवकर पचण्यास मदत करतात. जगभरात केळीचे (Raw Banana) साधारण एक हजाराहून अधिक प्रकार आढळतात. पिकलेल्या केळीचे जसे अनेक फायदे आहेत तसेच कच्च्या केळीचेही अनेक फायदे आहेत (Benefits Of Raw Banana).

 

कच्च्या केळीचे सेवन केल्याने पाचन क्षमता सुधारण्यास मदत होते. यात फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असते. हे दोन्ही पचनसंस्थेची क्षमता वाढवतात तसेच अन्न लवकर पचण्यास मदत करतात. त्याच वेळी, पोटाशी संबंधित अनेक आजारही (Stomach Problems) दूर होतात.

 

रक्तातील साखर नियंत्रित होते (Blood Sugar Control) –
कच्च्या केळीमध्ये प्रतिरोधक स्टार्च आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. प्रतिरोधक स्टार्च आणि तंतू रक्तात असलेल्या साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्यात आढळणारे इतर घटकही मधुमेहावरील (Diabetes) रामबाण उपाय ठरू शकतात. (Benefits Of Raw Banana)

 

बद्धकोष्ठता कमी होते (Relieve Constipation) –
बद्धकोष्ठता (Constipation), रक्तस्त्राव (Bleeding), संसर्गजन्य (Infectious), अतिसार (Diarrhea) आणि पोटाचा कर्करोग (Stomach Cancer) यासारख्या आजारांमध्ये कच्ची केळी खाल्ल्याने दुखणे कमी होण्यास मदत होते. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) मध्ये प्रकाशित झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार कच्च्या केळीमध्ये फायबर आणि स्टार्चचे प्रमाण चांगले असते आणि हे दोन्हीही घटक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचे (Gastrointestinal Disease) परिणाम कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात.

कर्करोग असलेल्यांना संजीवनी (Cancer Survivorship) –
कर्करोग असणार्‍यांना कच्च्या केळीचे सेवन हे अतिशय फायद्याचे आहे. कारण कर्करोगात वेळीच उपचार न मिळाल्याने मोठे नुकसान होते. अशा वेळी कच्ची केळी या रुग्णांसाठी एक संजीवनीचे काम करते. एनसीबीआयमध्ये (NCBI) प्रकाशित झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार, कच्च्या केळीच्या पिठात प्रतिरोधक स्टार्च असतो, त्यामुळे रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती सुधारते आणि आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका टळतो.

 

निरोगी हृदयासाठी फायदा (Beneficial For Healthy Heart) –
कच्च्या केळींमध्ये पाचन क्षमता वाढविणार्‍या फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्याचा उपयोग कोलेस्ट्रॉलच्या नियंत्रणासाठी होतो. परिणामी हृदय सुदृढ राहण्यास मदत होते.

 

सुरकुत्या जातात (Wrinkles) –
केळीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात.
यामुळे आरोग्याचे इतर फायदे तर मिळतातच शिवाय कच्ची केळी ही त्वचेसाठी आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या (Wrinkles) जाण्यासाठी फायदेशीर मानली गेली आहेत.
इतकंच नाही, तर मुरुमांच्या समस्येपासूनही (Acne Problem) मुक्त होता येते.

 

केसांसाठीही उपयुक्त (Useful For Hair) –
केसांची निगा राखण्यासाठीही केळी उपयुक्त आहेत. केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-के (Vitamin-K) मोठ्या प्रमाणावर असते.
हे पोषक घटक केस निरोगी आणि मऊ ठेवतात, त्यांचे पोषणही करतात आणि त्यांना तुटण्यापासून रोखतात.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Raw Banana | home remedy consumption of raw banana improves digestion and it removes face wrinkles too

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

 

Drumstick Controls Blood Pressure | शेवगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, पोटासह ‘या’ गोष्टींसाठीही फायदेशीर; जाणून घ्या

 

Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR