Benefits of Shalabhasana | ‘हे’ सोपे आसन पाठदुखीवर ‘रामबाण’, चरबी सुद्धा होते कमी; जाणून घ्या करण्याची पद्धत आणि 8 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Shalabhasana | शलभासन नियमित केल्याने अनेक आजारापासून बचाव होतो. पाठदुखीपासून सुटका आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी हे आसन मदत (Benefits of Shalabhasana) करते. याच्या नियमित सरावाने पाठीचा कणा मजबूत होतो. हे आसन कसे करावे आणि त्याचे फायेद जाणून घेवूयात.

असे करा शलभासन (how to do salabhasana)

– सर्वप्रथम चटईवर उलट पोटाच्या बळावर झोपा. पाठ वर आणि पोट खाली होईल.

दोन्ही पाय सरळ ठेवा आणि पायाचे पंजे सरळ आणि वरच्या बाजूला ठेवा.

हात सरळ करा आणि मांडीच्या खाली दाबा.

डोके आणि तोंड सरळ ठेवा.

नंतर सामान्य रहा आणि एक दिर्घ श्वास आत घ्या.

दोन्ही पाय वरच्या बाजूला उचलण्याचा प्रयत्न करा.

सुरूवातीला पाय वर करण्यासाठी हाताचा आधार घेऊ शकता.

या मुद्रेत किमान 20 सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.

नंतर हळुहळु श्वास बाहेर सोडत पाय खाली आणा.

पुन्हा सुरूवातीच्या स्थितीत या. हा सराव 3-4 वेळा करा.

शलभासनाचे फायदे (Benefits of Shalabhasana)

शलभासन वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

शरीरातील चरबी कमी होते.

मांसपेशी मजबूत होतात.

हात, मांड्या, पाय आणि पिंढर्‍या मजबूत होतात.

पोटाची चरबी कमी करून ते सुडौल होते.

पाठीचा कणा मजबूत होतो.

पचनक्रिया चांगली होते, पोटाचे आजार दूर होतात.

बद्धकोष्ठता ठिक होते. आम्ल आणि क्षारचे संतुलन राहते.

Web Title :- Benefits of Shalabhasana | benefits of shalabhasana know here how to do salabhasana its gives back pain relief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Relationship With Partner | प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नात ‘पार्टनर’ तुमच्यावर कंट्रोल तर करत नाही ना? ‘या’ 6 संकेतावरून ओळखा; जाणून घ्या

Pune Crime | शिबा कुरिझ व शिबा निधी चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना उच्च न्यायालयाचा दणका ! पुणे पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले ‘हे’ आवाहन

Supreme Court On DNA Test | डीएनए टेस्टसाठी सक्ती करणे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन : सुप्रीम कोर्ट