Benefits of Sleeping Naked | पुरूषांनी कपडे न घालता झोपलं पाहिजे, होतील ‘हे’ खास फायदे; महिलांसाठी देखील चांगलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Sleeping Naked | आपल्या सर्वांना माहित आहे की, झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे. परंतु हे खुप कमी लोकांना माहित आहे की, विना कपडे झोपणे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. नग्न झोपल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. तर, पुरुष आणि महिलांनासुद्धा यामुळे विशेष लाभ होतो. विना कपड्यांनी झोपण्याचे (Benefits of Sleeping Naked) कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

विना कपडे झोपण्याचे हे आहेत फायदे (Health Benefits of sleeping without clothes)

Sleep Foundation नुसार, आपले शरीर सर्केंडियन रिदमनुसार चालते. हा रिदम शरीर गरम आणि थंड होण्यावर सुद्धा अवलंबून आहे. झोपण्यासाठी 66 ते 70 डिग्री फॅरेनहाईट तापमान योग्य मानले जाते. यासाठी विना कपडे झोपणे शरीरीक तापमानाला कमी करून चांगली झोप देऊ शकते.

Sleep Foundation म्हणते, विना कपडे झोपल्याने महिलांचा कँडिडा यीस्ट इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो. कारण, हे इन्फेक्शन टाईट आणि सिंथेटिक अंडरवेयर घातल्याने हवेचा प्रवाह कमी झाल्याने होते. यासाठी महिला अशाप्रकारे झोपून कँडिडा संसर्गाने होणारे वजायनल इचिंग आणि पेनपासून रक्षण मिळवू शकतात.

स्लीप फाऊंडेशननुसार, नग्न झोपणे पुरुषांच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. कारण अनेक संशोधनात सांगण्यात आले आहे की, टाईट अंडरवियर घातल्याने स्क्रोटमचे तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता खराब होते. जर स्क्रोटमचे तापमान कमी किंवा सामान्य ठेवले तर वीर्याची गुणवत्ता आणि संख्येत सुधारणा होते.

नग्न झोपल्याने होणारे अन्य लाभ (Health Benefits of sleeping naked)

झोप चांगली मिळाल्याने त्वचा निरोगी होते.

वजन कमी करण्यात मदत होते.

आत्म-सन्मानात वाढ होऊ शकते.

पार्टनरसोबत रिलेशनशिप मजबूत होते.

Web Title :- benefits of sleeping without clothes for mens health and womens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Google वर 5000% जास्त सर्च केला गेला ‘हा’ शब्द ! नेमकं काय आहे ते जे संपुर्ण जगाला जाणून घ्यायचंय?

Pimpri Police | आर्मी इंटलिजन्सची पिंपरी-चिंचवड पोलिसांवर तीव्र ‘नाराजी’, जबाबदार कोण?

Beauty Tips | केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारींवर गुणकारी आहे बेलाचे पान