रिकाम्या पोटी हे ‘दूध’ प्यायल्याने शरीरातून ‘या’ प्राणघातक रोगाचा धोका होतो कमी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : असे म्हणतात की दररोज सकाळी नाश्ता करताना आणि रात्री झोपण्याच्या वेळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले असते. दुधामध्ये ते सर्व पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यात कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे आणि शरीराला आवश्यक असणारे सर्व पौष्टिक घटक असतात. तसेच हाडे मजबूत होण्यास देखील मदत होते. तसेच बरेच लोक असे आहेत जे शाकाहारी असतात. याचा अर्थ असा की ते दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. त्यांच्या आहारात चिकन किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टींचा समावेश नसतो. परंतु जर ते साध्या दुधाऐवजी सोयाच्या दुधापासून किंवा बदामाच्या दुधापासून बनलेले पदार्थ असतील तर ते त्यास घेऊ शकतात.

तुम्हाला माहित असावे की साध्या दुधापेक्षा नारळाचे दूध, बदामाचे दूध, तांदळाचे दूध आणि सोया दूध लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यापैकी सर्वात जास्त सोया दूध हे शरीरासाठी फायदेशीर असते.

गायीच्या दुधामध्ये आठ ग्रॅम प्रथिने आणि नऊ ग्रॅम चरबीसह 11.5 ग्रॅम कार्ब असते. दुसरीकडे जर आपण सोया दुधाबद्दल बघितलं तर त्यात गायीच्या दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. एक ग्लास सोया दुधात सुमारे 240 मि.ली. सर्व्हिंग्ज मध्ये 330 मि. ग्रॅम कॅल्शियम असतात. तसेच याच्या एका ग्लासात 95 कॅलरी आढळतात. सोया दुधात आढळणारे अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म कर्करोगाचा धोका देखील कमी करतात. जर आपण दररोज एक ग्लास पित असाल तर आपण योग्य प्रमाणात पोषक घटक घेत आहात.