Benefits of taking sunlight | हिवाळ्यात रोज इतकी मिनिटे घ्या सूर्यप्रकाश, अनेक आजार राहतील दूर; मिळतील 5 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of taking sunlight | हिवाळ्यात खाणे-पिणे जेवढे महत्वाचे असते, तेवढेच उन महत्वाचे असते, कारण हिवाळ्यात सूर्यकिरणे केवळ बाहेरील त्वचाच नव्हे, तर आतील अवयवांवर देखील परिणाम करतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक गरम कपडे घालतात, यामुळे शरीराला उन मिळणे कमी होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी होते. या समस्यांपासून वाचण्यासाठी सकाही 15 मिनिटे सूर्यप्रकाश अंगावर घेणे अतिशय (Benefits of taking sunlight) आवश्यक आहे.

 

उन घेण्याचे 5 जबरदस्त फायदे 

1. स्किन इन्फेक्शनचा धोका (Risk of skin infections)

सूर्याच्या प्रकाशात असे चमत्कारी गुण असतात, ज्यांच्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या इन्फेक्शनची शक्यता कमी होते. उन घेतल्याने शरीरात WBC (White blood cell count) योग्य प्रमाणात निर्माण होतात, ज्या रोग निर्माण करणार्‍या कारकांशी लढण्याचे काम करतात.

 

2. मुलांसाठी लाभदायक

मुलांसाठी उन घेणे अतिशय लाभदायक आहे. विशेषता त्या मुलांसाठी, ज्यांनी आईचे दूध पिणे सोडून दिले आहे, त्यांना उन घेण्याशिवाय भरपूर व्हिटॅमिन डी असलेले खाद्यपदार्थ खायला द्यावेत.

 

3. कॅन्सरपासून बचाव (Cancer prevention)

अनेक संशोधनातून समोर आले आहे की, जिथे सूर्यप्रकाश खुप कमी असतो किंवा जे लोक सूर्यप्रकाशात खुप कमी वेळ घालवतात त्यांना कॅन्सरची शक्यता जास्त असते. शिवाय कॅन्सर रूग्णांना सुद्धा उनात बरे वाटते.

4. व्हिटॅमिन डी मिळते (Vitamin D)

रोज उन घेतल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते,
जे हाडे मजबूत करते, सांधेदुखीच्या वेदना दूर होतात.

 

5. चांगली झोप

डॉक्टरांनुसार, उन्हात चांगला शेक घेतल्याने आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होते.
या हार्मोनमुळे चांगली आणि शांत झोप येते. मानसिक तणाव कमी होतो.

 

Web Title :- Benefits of taking sunlight | benefits of taking sunlight amazing benefits of taking 15 minutes of sunlight daily in winter marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या दिल्लीवारीने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी वाढणार?

Palghar Accident | एकवीरा देवीच्या दर्शनावरून परतताना ECO Car-कंटेनरमध्ये जोरात धडक; तिघांचा मृत्यु तर 9 जखमी

खुशखबर ! Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस बदलणे झाले सोपे, देशभरात उघडणार 166 सेवा केंद्र; ‘या’ पध्दतीची असेल सुविधा, जाणून घ्या

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी