Velchi Tea : उन्हाळ्यात सोडू नका चहा, रोज प्या एक कप वेलची चहा, होतील ‘हे’ 4 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आले आणि वेलची शिवाय चहाला चव येत नाही. परंतु उन्हाळ्यात अनेक लोक चहा पिणे टाळतात. आज आम्ही तुम्हाला वेलची चहा पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत, जे जाणून घेतले तर तुम्ही नक्कीच उन्हाळ्यात सुद्धा चहा बिनधास्त प्याल. वेलची चहा पिण्याचे फायदे जाणून घेवूयात.

1 पोषक तत्वयुक्त –
वेलचीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, बी6 आणि व्हिटॅमिन सी आढळते. सोबतच वेलची चहा प्यायल्याने वजन सुद्धा कमी होते.

2 फॅट कमी करते –
वाढलेले पोट सध्या लोकांची सर्वात मोठी समस्या आहे. हिरव्या वेलचीचा चहा प्यायल्याने पोटाच्या बाजूबाजूची चरबी कमी होते.

3 विषारी घटक बाहेर पडतात –
हिरवी वेलची शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते. हे विषारी घटक ब्लड सक्युलेशन रोखतात आणि उर्जेचा स्तर कमी करतात.

4 बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करा –
वेलची शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ती एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्राशग्लिसराईड्ससुद्धा कमी करण्यात मदत करते.

असा बनवा वेलची चहा
मध्यम आचेवर एका पॅनमध्ये पाणी उकळवा. उकळी येताच आले आणि थोडी वेलची टाकून उकळवा. थोड्यावेळानंतर यामध्ये चहापत्ती टाका. रंग गडद झाल्यानंतर आच वाढवून आणखी एक उकळी येऊ द्या. सुमारे 2-3 मिनिटांपर्यंत उकळवल्यानंतर आच बंद करून कपात गाळून घ्या.